जिला

गंगाधर गच्चे यांना पत्रकार न्यायचक्र पुरस्कार जाहीर..

 

नांदेड प्रतिनिधी : पत्रकारीता क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य करून समाज हिताच्या साठी अहोरात्र प्रयत्न करणाऱ्या अनेक मान्यवरांचा लोक जनजागृती संस्थेच्या वतीने मागील दहा वर्षापासून पुरस्कार देऊन सन्मान केला जातो यावर्षी ही विविध क्षेत्रांमध्ये कार्य करणाऱ्या मान्यवरांचा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात येणार आहे.

यावर्षी पत्रकार न्याय चक्र पुरस्कार जेष्ठ पत्रकार गंगाधर गच्चे यांना जाहीर झाला असून दिनांक 29 मार्च 2026 रोजी नांदेड शहरातील देवकृपा फंक्शन हॉलमध्ये लोकजनशक्ती पार्टीचे खासदार अरुण भारती प्रदेश अध्यक्ष प्रमोद कुदळे व संस्थेचे अध्यक्ष विजयकुमार सितळे यांच्या हस्ते हा पुरस्कार जेष्ठ पत्रकार गंगाधर गच्चे यांना प्रदान करण्यात येणार आहे.

गंगाधर गच्चे यांनी आजवर अनेक नामावंत वर्तमानपत्रांमध्ये आपली लेखणी चालवून अनेक गोरगरीब सामान्य जनतेला आपल्या लेखणीच्या माध्यमातून न्याय देण्याचं काम केलं आहे. पत्रकारितेच्या माध्यमातून अनेकांना त्यांनी न्याय मिळवून दिला आहे. या कार्याची दखल घेऊन लोक जनजागृती बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष विजयकुमार सितळे यांनी त्यांना 2026 या वर्षाचा पत्रकार न्यायचक्र पुरस्कार नुकताच घोषित केला आहे. या पुरस्काराबद्दल त्यांचे संपादक .ज्येष्ठ पत्रकार व सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *