जिला

बाल मित्रांच्या बळाने काम करण्याची अधिक प्रेरणा–अँड. चैतन्य बापू देशमुख

नांदेड/प्रतिनिधी –शाळेच्या दिवसापासून जपलेली मैत्री आजही तितकीच घट्ट असल्याचे पाहून मन आनंदित झाले आहे, कोणत्याही पदापेक्षा बाल मित्रांच्या बळाने काम करण्याची मला अधिक प्रेरणा मिळाली अशी भावनिक प्रतिक्रिया अँड .चैतन्य बापू देशमुख यांनी दिली. वजीराबाद येथील पायल प्लाझा होकर्णे निवास येथे प्रज्ञा, प्रतिभा निकेतन शाळा होळी, नांदेड येथील वर्ग मित्रांनी आयोजित केलेल्या सत्कार प्रसंगी ते बोलत होते.

इ.स.१९८४ वर्षाच्या दहावी वर्गातील वर्ग मित्रांनी अँड.चैतन्य बापू देशमुख यांची भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल त्यांच्या सर्व वर्ग मित्रांनी एकत्र येऊन भव्य असा सत्कार करून शुभेच्छा दिल्या. बापूंची बालमैत्री निष्ठ, पक्षनिष्ठा कायम असल्यामुळे आज भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश उपाध्यक्षपदी निवड झाली , याचा आम्हा सर्व मित्रांना अभिमान आहे.

यापुढे आम्हा सर्व मित्रांना आपण आमदार झाल्याचे पाहायचे आहे हे पाहत असतांना तू कोणत्याही बाल मित्रांना दुर्लक्षित करणार नाहीस अशा अपेक्षा व्यक्त करून उपस्थित मित्रांनी बापूंना भावी कार्यासाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी अरुणा होकर्णे व छाया लाभशेटवार, विजय होकर्णे यांनी सुंदर असे कार्यक्रमाचे नियोजन केले होते.

यावेळी बापूंना शुभेच्छा देण्यासाठी कितीतरी वर्षानंतर एकत्र आलेले वर्गमित्र आनंदात भारावून गेले होते. यावेळी अरुणा होकर्णे, छाया लाभशेटवार, गणेश धम्पलवार, अनिल गाडे, विजय होकर्णे, अँड.संजय देशमुख, संजय बोधणे, अजय देव, प्रल्हाद आयनेले, हरी धोपटे, दिनेश चव्हाण, अजय साकळे, राम जकाते, अरविंद चिंतावर आदी वर्गमित्रांची मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *