मला जिजाऊ, सावित्री, रमाई तुमच्यामध्ये दिसावी’ पथनाट्यातून जागर..
जागतिक महिला दिन अर्धापूर पोलिस ठाण्यात पथनाट्य सादर करून केला साजरा..

अर्धापूर :- उध्दव सरोदे / जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने अर्धापूर पोलीस ठाण्यात महिला सक्षमीकरणासाठी स्वामी विवेकानंद अकॅडमीच्या विद्यार्थ्यांनी पथनाट्य सादर करून जनजागृती केली. शहरातील स्वामी विवेकानंद अकॅडमी ही शिक्षणा बरोबरच सामाजिक परिवर्तन करण्यासाठी विद्यार्थ्यांमध्ये मुल्य रूजवते असते. ८ मार्च जागतिक महिला दिनानिमित्त बेटी बचाओ बेटी पढाओ हे पथनाट्य सादर करून विद्यार्थ्यांनी महिला सक्षमीकरणाचा जागर केला.
यावेळी पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मा चंद्रशेखर कदम यांच्या मार्गदर्शना खाली सहाय्यक पोलीस निरीक्षक विष्णुकांत कराळे,सहाय्यक पोलीस निरीक्षक चित्तरंजन ठेमकेवाड, शिक्षक योगेश पवळे,पोलीस कर्मचारी,होमगार्ड तसेच अकॅडमीचे संचालक सचिन हट्टेकर,अकॅडमीचे शिक्षक माधव पवार,शुभम हिंगमिरे, अमोल सरोदे,संतोष पारटकर आदी उपस्थित होते.
या पथनाट्यात स्वाती थाते,अक्षरा गुंजकर,सृष्टी राऊत,दुर्गा पवार,संजना भोकरे,सानिका पवार, वैभवी राऊत,चैतन्य शिंगारे,गायत्री भोकरे,संभाजी क्षीरसागर,अवधूत शिंदे,अप्पाराव भोकरे,मयूर क्षीरसागर,पृथ्वीराज क्षीरसागर आदिंनी सादरीकरण केले.यावेळी सहभागी विद्यार्थ्यांना पोलीस ठाण्याच्या वतीने प्रमाणपत्र देवून गौरविण्यात आले आणि पथनाट्य सादर करून आगळावेगळा जागतिक महिला दिन सादर केल्याने संपूर्ण अर्धापूर तालुक्यातून अकॅडमीचे कौतुक व अभिनंदन करण्यात येत आहे.



