क्राईम

नांदेड : पोलीस उप महानिरीक्षकांच्या पथकाची लोह्यात मटका बुकीवर धाड

 

नांदेड, दि. १९ (प्रतिनिधी) – नांदेड परिक्षेत्रातील अवैध व्यवसायांना आळा घालण्यासाठी पोलीस उप महानिरीक्षक श्री. शहाजी उमाप यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकाची स्थापना करून ते नांदेड व परभणी जिल्ह्यात रवाना करण्यात आले होते. या पथकाने लोहा व पालम येथे धडक कारवाया करत अवैध मटका व रेती वाहतूक प्रकरणांचा पर्दाफाश केला आहे.

दिनांक १८ मार्च २०२६ रोजी लोहा शहरातील छत्रपती शिवाजी चौक परिसरात एका शेडमध्ये सुरू असलेल्या मटका बुकीवर छापा टाकण्यात आला. या कारवाईत १७ आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून त्यांच्याकडून ६२,६०० रुपये रोख रक्कम व ३ मोबाईल असा एकूण ९६,१०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी लोहा पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ९२/२०२६ अंतर्गत महाराष्ट्र जुगार कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी कल्याण मटका खेळत व खेळवीत असल्याचे उघड झाले असून, यात लोहा नगरपरिषदेतील एका नगरसेवकाचाही समावेश असल्याची माहिती समोर आली आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सी. जी. पांचाळ यांच्याकडे सोपविण्यात आला आहे.

दरम्यान, १७ मार्च २०२६ रोजी पालम पोलीस ठाण्याच्या हद्दीत पालम–पेठपिंपळगाव मार्गावर अवैध रेती वाहतूक करणाऱ्या हायवा वाहनावर कारवाई करण्यात आली. या कारवाईत एक हायवा व चार ब्रास वाळू असा सुमारे १० लाख १४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. एका आरोपीस ताब्यात घेऊन त्याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता व महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस हवालदार शंकर कोलमवाड करीत आहेत.

या दोन्ही कारवायांमध्ये पथकाने एकूण ६२,६०० रुपये रोख, ३ मोबाईल, १ हायवा व ४ ब्रास वाळू असा एकूण सुमारे ११ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

सदर कारवाईत पोलीस उपनिरीक्षक पंकज इंगळे, पोलीस हवालदार प्रदीप खानसोळे, संजीव जिकलवाड तसेच गणेश धुमाळ व कामाजी गवळी यांनी सहभाग घेतला. पथकाच्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल पोलीस उप महानिरीक्षक श्री. शहाजी उमाप यांनी अधिकारी व अंमलदारांचे अभिनंदन केले आहे.

दरम्यान, नागरिकांनी आपल्या परिसरातील अवैध व्यवसायांची माहिती देण्यासाठी ‘खबर’ हेल्पलाइनचा वापर करावा, असे आवाहन करण्यात आले आहे. ९१ ५० १०० १०० या क्रमांकावर फोन किंवा व्हॉट्सअ‍ॅपद्वारे माहिती देता येणार असून, माहिती देणाऱ्याची गोपनीयता राखली जाईल, असेही पोलीस प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *