जिला

लेखा विभाग सक्षम करण्यामागे शिवप्रकाश चन्ना यांचे मोलाचे योगदान- मुख्‍य कार्यकारी अधिकारी मेघना कावली यांचे प्रतिपादन

 

नांदेड,7- जिल्हा परिषदेचे मुख्य लेखा व वित्त अधिकारी शिवप्रकाश चन्ना यांनी आपल्या कार्यकाळात लेखा विभागाचे नेतृत्व अत्यंत सक्षमपणे करत जबाबदारी यशस्वीपणे पार पाडली. त्यांच्या सखोल लेखा अभ्यास, नियोजनबद्ध कार्यपद्धती आणि काटेकोर अंमलबजावणीमुळे जिल्हा परिषदेचा कारभार सुरळीत व प्रभावीपणे चालला असल्याचे प्रतिपादन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक मेघना कावली यांनी व्यक्त केले. 31 मार्च रोजी वयोमानानुसार सेवानिवृत्त झालेल्या शिवप्रकाश चन्ना यांच्या सेवापूर्ती निमित्त आज जिल्हा परिषदेच्या कै. शंकराव चव्हाण सभागृहात मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली यांच्या अध्यक्षतेखाली भव्य निरोप समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी त्या बोलत होत्या.

यावेळभ्‍ जिल्‍हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक डॉ. संजय तुबाकले, सामान्य प्रशासन विभागाचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी राजकुमार मुक्कावार, डी.बी. गिरी, अमित राठोड, प्रशांत थोरात, मयूरकुमार आंदेलवाड, कृषी विकास अधिकारी डॉ. निलकुमार ऐतवडे, कार्यकारी अभियंता संजय शिंदे, शिक्षणाधिकारी वंदना फुटाणे, गट विकास अधिकारी विश्‍वनाथ अडबलवार, गट विकास अधिकारी शेखर देशमुख, उपशिक्षणाधिकारी निळकंठ पाचंगे, बाबुराव पुजरवाड, अविनाश देशमुख यांची उपस्थिती होती.

पुढे त्‍या म्हणाल्य, चन्ना साहेबांनी केवळ स्वतः उत्कृष्ट काम केले नाही, तर आपल्या सहकाऱ्यांकडूनही कोणताही त्रास न होता वेळेत कामे पूर्ण करून घेतली. विविध समित्यांसमोर त्यांनी आत्मविश्वासाने मांडणी केली. मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून मी दिलेली कोणतीही जबाबदारी त्यांनी कधीही नकार न देता यशस्वीरित्या पूर्ण केली. त्यांच्या कार्याची मी वेळोवेळी खातरजमा केली असून, त्यांनी कधीही कामात चूक केली नाही.

चन्ना यांनी लेखा विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देऊन विभाग अधिक सक्षम केला. त्यांच्या नेतृत्वाखाली तयार झालेली ही टीम पुढेही उत्कृष्ट कार्य करत राहील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. विशेष म्हणजे विभागातील महिला अधिकारी व कर्मचाऱ्यांनाही त्यांनी सक्षम बनवले. समजून घेऊन काम करणारे व महिलांचा सन्मान राखणारे अधिकारी अशी ओळख त्यांनी निर्माण केली असल्याचेही मेघना कावली यांनी नमूद केले. भविष्यातही लेखा विषयक मार्गदर्शनासाठी चन्ना यांचा सल्ला घेणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

कार्यक्रमाच्या प्रारंभी मेघना कावली यांच्या हस्ते शिवप्रकाश चन्ना यांचा सपत्नीक शाल, मानपत्र व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी त्यांचे दोन्ही चिरंजीव उपस्थित होते. तसेच उमरी पंचायत समितीचे गट विकास अधिकारी अडबलवार यांच्या सेवानिवृत्ती निमित्त त्यांनाही निरोप देण्यात आला. मानपत्राचे वाचन उपशिक्षणाधिकारी निळकंठ पांचगे यांनी केले.

यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप माळोदे यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की, शिवप्रकाश चन्ना मितभाषी असले तरी कामात अत्यंत काटेकोर होते. विविध विभागांचा निधी वेळेत खर्च व्हावा यासाठी त्यांनी सातत्याने पाठपुरावा केला. त्यांच्या काळात निधी खर्चाची गती उल्लेखनीय होती. नांदेड-वाघाळा महानगरपालिकेचे मुख्य लेखा व वित्त अधिकारी धनराज पांडे यांनीही त्यांच्या कार्यकाळाचे कौतुक करत कोषागार विभाग, स्थानिक लेखा परीक्षण आणि मनपा येथेही त्यांनी उत्कृष्ट कामगिरी केल्याचे नमूद केले.

याप्रसंगी बाबुराव पुजरवाड, अविनाश देशमुख, पवन तलवारे, किर्ती मावळे, राम कवडे, देवेंद्र देशपांडे, विशाल हिवरे, किशोर जाधव, गट विकास अधिकारी विश्‍वनाथ अडबलवार, गट विकास अ‍धिकारी शेखर देशमुख यांनी मनोगत व्‍यक्‍त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजेश जोंधळे यांनी केले, तर उपस्थितांचे आभार शिवराज माटाळकर यांनी मानले. मुख्‍य कार्यकारी अधिकारी यांचे स्वियसहायक बालाजी नागमवाड, शुभम तेलेवाड, गट विकास अधिकारी अभय नलवाडे, विलास भोसीकर, सीएम फेलो भार्गवी मुंडे यांच्‍यासह जिल्‍हा परिषेचे अधिकारी व कर्मचारी यांची मोठया संख्‍येने उपस्थिती होती.

 

यावेळी आपल्या भावना व्यक्त करताना शिवप्रकाश चन्ना म्हणाले, मी 1986 साली शासकीय सेवेत रुजू झालो. विविध विभागांत काम करण्याची संधी मिळाली. जिथे जिथे काम केले, तिथे सहकारी अधिकारी व कर्मचारी यांचे उत्तम सहकार्य लाभले. त्यांच्या पाठबळामुळेच मी वेळेत व प्रभावी काम करू शकलो. कोषागार विभाग, स्थानिक लेखा परीक्षण, महानगरपालिका व जिल्‍हा परिषदेत येथे सेवा देताना वरिष्ठ अधिकारी व कर्मचाऱ्यांनी दिलेल्या मार्गदर्शनामुळेच कार्यात यश मिळाल्याचे ते म्‍हणाले – शिवप्रकाश चन्ना

 

 

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *