दिव्यांगांच्या प्रलंबित प्रश्नांवर प्रशासन उदासीन – 8 एप्रिलपासून बेमुदत आंदोलनाचा इशारा

नांदेड जिल्ह्यातील दिव्यांग बांधवांच्या विविध प्रलंबित प्रश्नांबाबत प्रशासनाकडून अद्याप कोणतीही ठोस कार्यवाही न झाल्याने, सर्वसमावेशक दिव्यांग सशक्तीकरण असोसिएशन, नांदेड (नोंदणी प्रक्रिया सुरू) तसेच दिव्यांग वृद्ध निराधार मित्र मंडळ महाराष्ट्रसह बेरोजगार दिव्यांग कल्याणकृती संघर्ष समिती व इतर सकल दिव्यांग संघटनांकडून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.
संघटनेचे अध्यक्ष राहुल सिताराम साळवे यांनी दिलेल्या माहितीनुसार, दिव्यांगांच्या विविध मागण्यांसाठी सातत्याने पाठपुरावा करूनही प्रशासनाकडून दुर्लक्ष होत असल्याने आता आंदोलनाचा मार्ग स्वीकारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
📌 प्रमुख मागण्या पुढीलप्रमाणे:
१) संजय गांधी निराधार अनुदान योजनेतील थकीत मानधन उर्वरित लाभार्थ्यांच्या खात्यात त्वरित जमा करण्यात यावे.
२) आमदार व खासदार निधीतून दिव्यांगांसाठी राखीव निधी खर्च करावा
३) DPDC अंतर्गत 1% निधीचा वापर करावा
४) जिल्हाधिकारी यांच्या बैठकीतील निर्णयांची अंमलबजावणी करावी
५) दिव्यांग सक्षमीकरण विभागातील अधिकाऱ्यांच्या कार्यप्रणालीची चौकशी करावी
६) वरिष्ठ अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या संपत्तीची चौकशी करावी
७) मा. तुकाराम मुंढे यांची बदली तात्काळ रद्द करावी
८) संघटनेने यापूर्वी 2 एप्रिल 2026 रोजी मुंबई येथील मंत्रालयात आंदोलन करून मुख्यमंत्री सचिवालयाला निवेदन दिले होते, तसेच 4 एप्रिल रोजी स्मरणपत्र पाठविण्यात आले आहे. या आंदोलनास विविध वृत्तवाहिन्यांनी मोठ्या प्रमाणावर प्रसिद्धी दिली होती.
९) तसेच, पावसाळी अधिवेशनादरम्यान विधानभवनात दिव्यांग कल्याण मंत्री Atul Save यांच्यासोबत बैठक होऊन मुख्यमंत्री स्तरावर बैठक आयोजित करण्याचे आश्वासन देण्यात आले होते. मात्र, अद्याप त्या आश्वासनाची पूर्तता झालेली नाही, अशी खंत संघटनेने व्यक्त केली आहे.
⚠️ आंदोलनाचा इशारा:
8 एप्रिल 2026 पासून जिल्हाधिकारी कार्यालय, नांदेड येथे बेमुदत आंदोलन सुरू करण्यात येणार आहे.
मागण्या मान्य न झाल्यास 9 एप्रिलपासून Mantralaya Mumbai येथे तीव्र आंदोलन छेडण्यात येणार आहे.
पोलीस बळाचा वापर झाल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा
संघटनेच्या वतीने प्रशासनास शेवटचा इशारा देण्यात आला असून, तात्काळ कार्यवाही न झाल्यास आंदोलनाची जबाबदारी पूर्णपणे शासन व प्रशासनावर राहील, असे स्पष्ट करण्यात आले आहे.



