जिला

सक्षम पोलीस दल हेच मजबूत नेतृत्वाचे बळ –पोलीस निरीक्षक धीरज चव्हाण

पोलीस दलातील पदोन्नती व बदली निमित्त सत्कार व निरोप कार्यक्रम

सक्षम पोलीस दल हेच मजब

मुदखेड तालुका प्रतिनिधी मोहम्मद हकीम

मुदखेड पोलीस स्टेशनच्या सभागृहात आज दि. 08 एप्रिल रोजी दुपारी 01.00 वाजता पोलीस विभागातील पदोन्नती व बदलीनिमित्त छोटेखानी सत्कार व निरोप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून मुदखेड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक धीरज चव्हाण हे होते आपल्या अध्यक्षीय भाषणातून बोलताना चव्हाण यांनी म्हटले की सक्षम पोलीस दल हेच मजबूत नेतृत्वाचे बळ असल्याचे प्रतिपादन करत दोन्ही पोलीस कर्मचाऱ्यांच्या कार्यांचा उल्लेखनीय शब्दांत प्रशंसा व भविष्यकाळातील चांगले आरोग्य आणि भविष्यात पोलीस दलात अनेक महत्त्वाच्या जबाबदाऱ्यांमध्ये त्यांचे कार्य उज्ज्वल व द्वैदिप्यमान राहील असे प्रतिपादन केले.

 

या कार्यक्रमात मुदखेड पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक नारायणसिंग रघुवंशी यांची पोलीस उपनिरीक्षक पदावर पदोन्नती झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला.

तसेच मागील काही वर्षांपासून शहराच्या उत्तर भागात बीट जमादार म्हणून कर्तव्यदक्षपणे सेवा बजावणारे चंद्रशेखर मुंडे यांची किनवट येथे बदली झाल्याने त्यांनाही निरोप देण्यात आला यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक बाबासाहेब कांबळे,पोलीस उपनिरीक्षक शिवाजी शिंदे,सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक गवई ,जमादार भिसे,चक्रधर,अंगात कादम, जिल्हा विशेष शाखेचे किशोर जामदार पाटील सह आदी पोलीस कर्मचारी उपस्थित होते.

 

यावेळी नगरपरिषदेचे पाणीपुरवठा सभापती श्यामचंद्रे,नगरसेवक उपेंद्र देवदे,नगरसेविका प्रतिनिधी महंमद नयुम बागवान,काँग्रेस पक्षाचे जिल्हा सहसचिव गिरीश अप्पा कोत्तावार,शहर युवक काँग्रेस अध्यक्ष मुजीब पठाण,माजी उपनगराध्यक्ष करीम खान साब, नगरसेवक अविनाश चौंदते, अंकुश मामीडवार, ज्येष्ठ पत्रकार हाजी मोहम्मद अजगर हुसेन,नांदेड जिल्हा पत्रकार संघाचे सहसचिव ईश्वर पिन्नलवार,ज्येष्ठ पत्रकार संतोष पाटील गाडे,जयराम वने,प्रल्हाद मस्के,सिद्धार्थ चौदंते,

रुखमाजी शिंदे,राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष मोहम्मद बुरहान,अतिक अहेमद,धम्मदाता कांबळे,अब्दुल रजाक,अमोल टेकले,नामदेव राहरे,अब्दुल हफिज कुरेशी,मोहम्मद हकीम,महंमद हकीम बागवान कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पत्रकार संतोष सावंत यांनी केले तर आभार निवृत्त ए एस आय देशमुख यांनी महाराष्ट्र गीत सामूहिकपणे गात कार्यक्रमाची सांगता झाली.

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *