हेल्थ

जिल्हा परिषदेत फुले-आंबेडकर जयंतीनिमित्त आज भव्य रक्तदान शिबिर; 14 रोजी अभिवादन व विविध कार्यक्रम

 

नांदेड,12- जिल्हा परिषद नांदेड येथे महात्मा ज्योतिबा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंती महोत्सवानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.या अंतर्गत आज सोमवार दि. 13 एप्रिल रोजी सकाळी 10 वाजता जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

तर मंगळवार, दि. 14 एप्रिल रोजी सकाळी 10 वाजता रेल्वे स्टेशन परिसरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास जिल्हा परिषद परिसरातून बँड वाजत-गाजत मिरवणूक काढून अभिवादन करण्यात येणार आहे. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक मेघना कावली, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप माळोदे, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक डॉ. संजय तुबाकले, मुख्य लेखा व वित्त अधिकारी महेश देशमुख, उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजकुमार मुक्कावार, दत्तात्रय गिरी, प्रशांत थोरात, मयूर आंदेलवाड, अमित राठोड, कार्यकारी अभियंता संजय शिंदे, राहुल भोजराज,

समाज कल्याण अधिकारी सत्येंद्र आऊलवार, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संतोष सूर्यवंशी, पशुसंवर्धन अधिकारी डॉ. सखाराम खुणे, शिक्षणाधिकारी वंदना फुटाणे, माधव सलगर, दिलीपकुमार बनसोडे, कृषी अधिकारी नीलकुमार ऐततवडे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. याच दिवशी सकाळी 10.30 वाजता जिल्हा परिषद परिसरात अन्नदान व पाणी वाटपाचा कार्यक्रम होणार असून, सकाळी 11 वाजता यशवंतराव चव्हाण सभागृहात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादनाचा मुख्य कार्यक्रम पार पडणार आहे. त्यानंतर गीत गायनाचा कार्यक्रम होणार आहे.

तरी या कार्यक्रमास अधिकारी व कर्मचाऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन संयुक्त जयंती महोत्सवाचे अध्यक्ष रणजीत गजभारे, सचिव राजेश जोंधळे, कार्याध्यक्ष धनंजय गुम्मलवार, कोषाध्यक्ष विजय वाघमारे, सहसचिव राघवेंद्र मदनुरकर, बालाजी नागमवाड, अशोक मोकले, प्रसिद्धीप्रमुख मिलिंद व्यवहारे, जितेंद्र तोटलवार, उज्वला गजभारे, स्वाती जोंधळे, कीर्ती मिवळे, बालाजी टोके, सुनील कदम, दीपक महालिंगे, नंदलाल लोकडे, गणेश आंबेकर आदी पदाधिकाऱ्यांनी केले आहे.

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *