जिला

विश्वशांती बुद्ध विहाराच्या नियोजित जागेचा नामफलक अनावरण सोहळा उत्साहात

लोहा : महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त जायकवाडी वसाहत येथे विश्वशांती बुद्ध विहाराच्या नियोजित जागेच्या नामफलकाचे अनावरण करण्यात आले. हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात व भक्तिभावाच्या वातावरणात पार पडला.
या प्रसंगी जेष्ठ नगरसेवक बबनराव निर्मले, नगरसेवक केतन खिल्लारे तसेच महाराष्ट्र शासनाचा डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कार प्राप्त बी. बी. गाायसमुद्रे यांची प्रमुख उपस्थिती होती.

याशिवाय सुनिवृत्त मुख्याध्यापक वाय. बी. महाबळे, अनिलदादा गायकवाड, प्रा. राजेश ढवळे, यशपाल निर्मले, शिध्दार्थ ससाणे, लक्ष्मण कांजले, बुध्दभूषण खिल्लारे, सोनू महाबळे, गौतम वाघमारे, शेषराव हंकारे, चांचू गायकवाड, संतोष वाघमारे, विशाल गायसमुद्रे, कुनाल गायसमुद्रे आदी मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमात मोठ्या संख्येने उपासक-उपासिका सहभागी झाले होते. विश्वशांती बुद्ध विहाराच्या उभारणीमुळे परिसरात सामाजिक व आध्यात्मिक वातावरण अधिक दृढ होईल, असा विश्वास उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केला. छाया : विनोद महाबळे

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *