जिला

नांदेडमध्ये 16 पोलीस उपनिरीक्षकांना नवीन नियुक्त्या; पदोन्नतीनंतर जबाबदाऱ्या निश्चित

नांदेड (प्रतिनिधी) – नांदेड जिल्हा पोलीस दलातील 16 पोलीस अंमलदारांना पोलीस उपनिरीक्षक पदावर पदोन्नती मिळाल्यानंतर त्यांच्या नव्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या आहेत. या सर्व अधिकाऱ्यांनी दि. 16 एप्रिल 2026 रोजी पदोन्नती स्विकारून पोलीस महासंचालकांच्या आदेशानुसार नांदेड परिक्षेत्रातील पोलीस उपमहानिरीक्षक कार्यालयात हजेरी लावली होती. त्यानंतर दि. 17 एप्रिल रोजी त्यांना नांदेड पोलीस अधीक्षक कार्यालयात हजर करून घेण्यात आले.

पोलीस अधीक्षक कार्यालयातील प्रभारी कार्यालय अधीक्षक सी.पी. कपाळे यांच्या स्वाक्षरीने या सर्व नवपदोन्नत अधिकाऱ्यांना विविध ठिकाणी नियुक्त्या देण्यात आल्या. जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीने या बदलांकडे महत्त्वाचे पाऊल म्हणून पाहिले जात आहे.

नियुक्त अधिकाऱ्यांमध्ये दत्तात्रय अत्रिनंद गिरी यांची कुंडलवाडी येथे, नारायणसिंह भवमसिंह रघुवंशी यांची उमरी येथे, तर उत्तम रामराव सकनुरे यांची देगलूर येथे नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच अनिल गंगाधर मानेकर यांना इतवारा, तर विश्वनाथ शंकरराव वसमते यांना विमानतळ सुरक्षा नियंत्रण कक्षात जबाबदारी देण्यात आली आहे.

याशिवाय व्यंकट परशुराम शिंदे (बारड), मोहम्मद गौस गुलाम जिलानी (स्ट्रीट पेट्रोलिंग पथक), संतोष गंगाधर तिडके (शहर वाहतूक शाखा, वजिराबाद), साहेबराव आलु आडे (इतवारा), विठ्ठल श्रीमंतराव खोमणे (जिल्हा विशेष शाखा), विश्वंभर दिगंबरराव निकम (कुंटूर), बालासाहेब सदाशिव पांपटवार (सोनखेड), शेख रसुल महेबुब साब (तामसा), विठ्ठल माधवराव गवळी (इतवारा), हनुमंत निवृत्ती तुपकर (नियंत्रण कक्ष, नांदेड) आणि महम्मद जाकेर शेख कासीम (वाचक, इतवारा उपविभाग) यांचा समावेश आहे.

नवीन जबाबदाऱ्या स्वीकारल्यानंतर सर्व उपनिरीक्षकांनी कार्यक्षमता, शिस्त आणि जनतेच्या सुरक्षेला प्राधान्य देत काम करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. या नियुक्त्यांमुळे नांदेड जिल्ह्यातील पोलीस यंत्रणा अधिक बळकट होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *