ऑपरेशन अमानत अंतर्गत प्रवाशांचे ४.६० लाखांचे सामान परत

दुसऱ्या घटनेत ऑपरेशन अमानत अंतर्गत दिनांक २१ एप्रिल २०२६ रोजी डीएससीआर/नांदेड कंट्रोल कडून संदेश प्राप्त झाला की गाडी क्रमांक 12716 सचखंड एक्सप्रेस च्या A-2 डब्याच्या दरवाजाजवळ तीन बॅगा बेवारस अवस्थेत आढळून आल्या आहेत.
संदेश मिळताच IPF/पूर्णा @ परभणी यांच्या मार्गदर्शनाखाली SIPF सेलू श्री. आर. के. मीना तसेच कर्तव्यावर असलेले कर्मचारी हेड कॉन्स्टेबल जगदे प्रसाद यांनी सेलू रेल्वे स्थानकावर गाडी येताच त्या बॅगा सुरक्षितपणे खाली उतरवून ताब्यात घेतल्या.
यानंतर बॅगांच्या मालकाचा शोध घेऊन त्यांच्याशी संपर्क साधण्यात आला. संबंधित प्रवाशाने आपले नाव कदम अश्रू किसन (वय ३२ वर्षे), रा. जोतिबाचीवाडी, उस्मानाबाद असे सांगितले. त्यांनी सांगितले की ते आपल्या कुटुंबासह गाडी क्रमांक 12715 सचखंड एक्सप्रेसने जालना ते अमृतसर प्रवास करत होते. प्रवासादरम्यान B-4 डबा (बर्थ क्रमांक 47 व 55, RAC) मध्ये त्यांचा प्रवास होता. चुकून त्यांनी आपले सामान 12716 सचखंड एक्सप्रेस मध्ये ठेवले होते.
संबंधित प्रवाशाचा जबाब नोंदवून पडताळणी केल्यानंतर त्यांना त्यांचे सामान सुरक्षित अवस्थेत पावती घेऊन सुपूर्द करण्यात आले.
सदर बॅगांमध्ये खालील साहित्य आढळले:
• ३० ग्रॅम सोन्याचे दागिने (अंदाजे किंमत ₹४.५ लाख)
• कपडे
• चार्जर
• पर्स
• खाद्यपदार्थ
एकूण किंमत: ₹४,६०,०००
या दोन्ही यशस्वी कारवायांमुळे आरपीएफ नांदेड विभागाची सतर्कता, कर्तव्यदक्षता व प्रवाशांच्या सुरक्षेबाबतची बांधिलकी अधोरेखित झाली आहे.



