Uncategorized

अवैध खंजरासह तिघांना ताब्यात; स्ट्रिट सेफ्टी पथकाची धडक कारवाई

 

नांदेड, दि. 24 (प्रतिनिधी) – शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी सुरू असलेल्या स्ट्रिट सेफ्टी ड्राईव्ह अंतर्गत पोलिसांनी अवैध हत्यार बाळगणाऱ्या व संशयास्पदरीत्या फिरणाऱ्या तिघांना ताब्यात घेतले असून त्यांच्या कडून 1,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांच्या आदेशानुसार शहरात कॉम्बिंग ऑपरेशन राबविण्यात येत आहे. त्याच अनुषंगाने स्ट्रिट सेफ्टी पथक गस्त घालत असताना माळटेकडी ब्रिज परिसरात एक इसम अवैध हत्यारासह फिरत असल्याची माहिती मिळाली. तत्काळ कारवाई करत पोलिसांनी संशयित इसमाला ताब्यात घेतले.

चौकशीदरम्यान त्याने आपले नाव सुनिलसिंग दर्शनसिंग दुधानी (वय 26, रा. भारत कॉलनी, अहमदपूर, जि. लातूर) असे सांगितले. त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याकडून 1,000 रुपये किमतीचा लोखंडी खंजर जप्त करण्यात आला.

दरम्यान, त्याच परिसरात गस्त घालत असताना अंधारात संशयास्पदरीत्या दबा धरून बसलेले आणखी दोन इसम आढळून आले. त्यांना ताब्यात घेऊन विचारपूस केली असता त्यांनी आपली नावे अर्जुनसिंग धारासींग दुधानी (वय 31, रा. साखला प्लॉट, परभणी) व किरपालसिंग गुरुबच्चनसिंग दुधानी (वय 26, रा. साखला प्लॉट, परभणी) अशी सांगितली.

वरील तिन्ही आरोपींना विमानतळ पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले असून त्यांच्याविरुद्ध भारतीय हत्यार कायद्यानुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *