जिला

हिमायतनगर मध्ये 31 सामूहिक विवाह सोहळा उत्साहात संपन्न

 

हिमायतनगर, नांदेड: आज रविवार, 27 एप्रिल रोजी नांदेड शहरातील एक मान्यवर व्यक्तिमत्त्व व समाजसेवक हाजी अब्दुल वहीद सेठ यांच्या पुढाकारातून दरवर्षीप्रमाणे यंदाही सामूहिक विवाह सोहळ्याचे भव्य आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात एकूण 31 जोडप्यांचे विवाह यशस्वीरित्या पार पडले.

हाजी अब्दुल वहीद सेठ हे महिंद्रा अँड महिंद्रा ट्रॅक्टरचे डीलर व शोरूम मालक असून, ते अनेक वर्षांपासून सामाजिक आणि लोकसेवेच्या कार्यात सक्रिय आहेत. त्यांच्या “तहजीब फाउंडेशन”च्या माध्यमातून हा उपक्रम सातत्याने राबवला जात आहे. आतापर्यंत शेकडो सामूहिक विवाह त्यांच्या प्रयत्नातून यशस्वीपणे पार पडले आहेत.

या सोहळ्यात वधू-वरांच्या कुटुंबीयांसह शेकडो पाहुण्यांनी उपस्थिती लावली. तसेच शहरातील अनेक मान्यवरांनीही हजेरी लावली. यामध्ये शेख रफीक सेठ, जावेद सेठ, समद खान, हाजी जलाल खान, फिरोज खान, हाजी युसुफ खान, मुबीन सेठ, हनीफ सर आणि मौलाना अब्दुल कुदूस कुरेशी यांचा समावेश होता. याशिवाय उलेमा, पत्रकार, सामाजिक व साहित्यिक क्षेत्रातील व्यक्तींनीही सहभाग नोंदवून कार्यक्रमाची शोभा वाढवली.

या सामूहिक विवाह सोहळ्याच्या यशस्वी आयोजनामध्ये अलहाज अब्दुल मुबीन सेठ (मुबीन कंपनी) आणि मौलाना अब्दुल कुदूस कुरेशी यांनी विशेष मेहनत घेतली. त्यांनी अनेक महिन्यांपासून अथक परिश्रम करून हा कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पाडला.

या उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक करण्यात येत असून, गरजू कुटुंबांना मोठा दिलासा देणारा हा उपक्रम असल्याचे मत व्यक्त करण्यात आले. कार्यक्रमाच्या शेवटी हाजी अब्दुल वहीद सेठ व त्यांच्या सहकाऱ्यांसाठी विशेष प्रार्थना करण्यात आल्या.

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *