सह दुय्यम उपनिबंधक कार्यालय परिसरातून दुचाकी चोरीस

नांदेड, 29- शहरातील शिवाजीनगर परिसरातील उपनिबंधक कार्यालयासमोर उभी केलेली दुचाकी अज्ञात चोरट्यांनी लंपास केल्याची घटना घडली आहे. याबाबत शिवाजीनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
वाघी तांडा ता. नांदेड येथील रहिवासी साहेबराव धेनु चव्हाण हे मंगळवारी दि. 28 एप्रिल रोजी नांदेड येथील सह दुय्यम उपनिबंधक कार्यालयात कामानिमित्त आले होते. त्यांनी आपली एमएच 26 बी एफ 2271 क्रमांकाची पॅशन प्रो दुचाकी कार्यालयासमोर उभी केली होती. दुपारी 1 ते 2 वाजेदरम्यान अज्ञात व्यक्तींनी लंपास केल्याची घटना घडली आहे.
सह दुय्यम उपनिबंधक कार्यालयातील कामकाज आटोपून बाहेर आल्यानंतर दुचाकी वाहन जागेवर दिसून आले नाही. त्यामुळे साहेबराव चव्हाण यांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे. सदर दुचाकी कोणास आढळून आल्यास शिवाजीनगर पोलीस ठाणे किंवा साहेबराव चव्हाण यांच्याशी भ्रमणध्वनी क्रमांक 7558632727 वर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.



