जिला

हज यात्रेकरूंसाठी अतिरिक्त सुविधा देण्याची मागणी; AIMIMचे रेल्वे प्रशासनाला निवेदन

नांदेड : हज यात्रेकरूंच्या सोयीसाठी नंद्रीग्राम, देवगिरी आणि राज्यराणी एक्स्प्रेस या रेल्वेगाड्यांना अतिरिक्त स्लीपर कोच जोडावेत, तसेच रेल्वेमध्ये स्वच्छता, अतिरिक्त पोलिस बंदोबस्त आणि यात्रेकरूंच्या स्वागतासाठी स्वतंत्र जागा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

ही मागणी ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन (AIMIM) च्या वतीने अतिरिक्त रेल्वे महाव्यवस्थापक कुमार गौरव यांना निवेदनाद्वारे करण्यात आली. हज यात्रेच्या पार्श्वभूमीवर दरवर्षी मोठ्या संख्येने यात्रेकरू प्रवास करत असल्याने त्यांना अधिक सोयी-सुविधा उपलब्ध करून देणे गरजेचे असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

यावेळी सय्यद मोईन, फेरोज लाला, माजी उपमहापौर मोहंमद मसूद अहेमद खान, माजी सभापती अब्दुल शमीम अब्दुल्ला, नगरसेविका आसिया बेगम अ. हबीब बागवान, नगरसेविका सायमा खान इमरान अहेमद खान, नगरसेवक सय्यद फसीउद्दीन स. वलीउद्दी, नगरसेविका बेबी शाईस्ता मा. सलमान खान, नगरसेविका अश्विनी धोंडगे, नगरसेवक अलताफ हुसेन मो. युसूफ, नगरसेवक अब्दुल लतिफ अब्दुल मजीद, नगरसेविका शिफा तरन्नुम, अब्दुल रऊफ, नगरसेविका मुस्कान नाज सय्यद वाजिद, नगरसेवक सय्यद मुजीब सय्यम मुख्तार, नगरसेविका कुरेशी रेहाना बेगम चाँद पाशा, नगरसेविका शमीम बेगम अब्दुल हफीज,

नगरसेवक मो. नासेर अहेमद मो. इकबाल, नगरसेविका अलकसेरी सुमय्या गुलफिशा सरहान अलकसेरी, माजी नगरसेवक रहीम अहेमद खान, माजी नगरसेवक अन्सार अहेमद खान, सोहेल रमजानी, इमरान धोंगडे, रिजवान खान, मोहम्मद रफिक, इरफान खान आदी उपस्थित होते. हज यात्रेकरूंना सुरक्षित व सोयीस्कर प्रवास मिळावा, यासाठी रेल्वे प्रशासनाने सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा यावेळी व्यक्त करण्यात आली. (छायाचित्र : ज्ञानेश्वर सुनेगावकर)

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *