क्राईम

नांदेड शहरात मटका अड्ड्यावर धाड : ८ जणांवर कारवाई, ३१ हजारांचा मुद्देमाल जप्त

नांदेड, दि. ३० एप्रिल — नांदेड शहरात सुरू असलेल्या अवैध मटका व्यवसायावर पोलीस उपमहानिरीक्षकांच्या विशेष पथकाने धाड टाकून कारवाई केली. या कारवाईत एकूण ८ जणांविरुद्ध गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू असून ३१,२७० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

पोलीस उपमहानिरीक्षकांच्या अवैध व्यवसायविरोधी पथकास शिवाजीनगर पोलीस ठाणे हद्दीत मटका सुरू असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. त्यानुसार दि. ३० एप्रिल २०२६ रोजी नवीन मोंढा परिसरातील जय गुरुदेव पान शॉपजवळ लिंबाच्या झाडाखाली छापा टाकण्यात आला.

छाप्यात चार जण मटका खेळताना आढळून आले. त्यांना ताब्यात घेऊन तपासणी केली असता त्यांच्या जवळून १५,७७० रुपयांची रोकड व १५,५०० रुपयांचे तीन मोबाईल असा एकूण ३१,२७० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

ताब्यातील आरोपींकडून चौकशी केली असता मटका व्यवसायाचे मालक म्हणून अब्बास (रा. नई आबादी, शिवाजीनगर), शेख जमीर (रा. इतवारा), तसेच बुकी म्हणून संजय गायकवाड (रा. भारत गॅस गोदामाजवळ, नवीन मोंढा) व ईश्वर जाधव (रा. खोब्रागडे नगर, नवीन मोंढा) यांची नावे समोर आली आहेत.

या प्रकरणी मटका खेळणारे व संबंधित मालकांविरुद्ध शिवाजीनगर पोलीस ठाण्यात महाराष्ट्र जुगार कायद्यान्वये गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू आहे.

ही कारवाई पोलीस उपनिरीक्षक पंकज इंगळे, पोहेकॉ प्रदीप खानसोळे, पोहेकॉ संजीव जिंकलवाड, पोका गणेश धुमाळ व पोका कामाजी गवळी यांच्या पथकाने केली. पथकाच्या या कामगिरीबद्दल पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप यांनी कौतुक करून अधिकाऱ्यांना प्रोत्साहन दिले.

खबर’ हेल्पलाइनद्वारे माहिती द्या
नांदेड परिक्षेत्रात अवैध व्यवसायांवर नियंत्रण ठेवण्यासाठी ‘खबर’ हेल्पलाइन सुरू करण्यात आली असून नागरिकांनी ९१ ५० १०० १०० या क्रमांकावर फोन किंवा व्हॉट्सअ‍ॅपद्वारे माहिती द्यावी, असे आवाहन पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप यांनी केले आहे.

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *