जिला

“ऑपरेशन क्रॅकडाउन” : नांदेड पोलिसांची विशेष मोहीम ३० एप्रिल ते १५ मे दरम्यान राबविणार

 

नांदेड, दि. ३० एप्रिल — जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अधिक बळकट करण्यासाठी नांदेड जिल्हा पोलिसांच्या वतीने “ऑपरेशन क्रॅकडाउन” ही विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे. ही मोहीम दि. ३० एप्रिल २०२६ ते १५ मे २०२६ या कालावधीत तीव्र स्वरूपात राबवली जाणार असून अवैध मटका, जुगार, अंमली पदार्थ तसेच अवैध शस्त्रांविरोधात व्यापक कारवाई केली जाणार आहे.

यापूर्वीही नांदेड पोलिसांनी अंमली पदार्थांविरोधात विशेष पथक स्थापन करून महिनाभर मोहीम राबवली होती. तसेच अवैध अग्निशस्त्रांविरोधात कारवाई करत एका महिन्यात ९ देशी पिस्तूल व ७० जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली होती. कॉम्बिंग व सर्च ऑपरेशन्सदरम्यान ७० हून अधिक कारवाया करण्यात आल्या होत्या. या पार्श्वभूमीवर आता अधिक ठोस आणि व्यापक स्वरूपात ही मोहीम राबवली जात आहे.

पोलीस अधीक्षक कार्यालयाकडून जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाणे प्रभारी अधिकाऱ्यांना अवैध मटका, जुगार, अंमली पदार्थ व अवैध शस्त्र व्यवसायाविरोधात कठोर कारवाई करण्याचे तोंडी व लेखी आदेश देण्यात आले असून त्यानुसार कारवाईला सुरुवात झाली आहे.

या मोहिमेअंतर्गत पोलीस ठाणे प्रभारी अधिकाऱ्यांना त्यांच्या हद्दीत सुरू असलेल्या अवैध व्यवसायांवर ठोस कारवाई करणे, संबंधित गुन्ह्यांमागील सूत्रधारांचा शोध घेणे, त्यांच्यावर गुन्हे दाखल करणे तसेच अवैध धंदे समूळ नष्ट करण्यासाठी उपाययोजना करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. सराईत व वारंवार गुन्हे करणाऱ्या आरोपींविरुद्ध कलम १११ व ११२ अंतर्गत प्रतिबंधात्मक कारवाई करण्याचेही नियोजन करण्यात आले आहे.

उपविभागीय पोलीस अधिकारी यांनी आपल्या कार्यक्षेत्रातील पोलीस ठाण्यांना भेट देऊन कारवाईचा आढावा घेणे, मार्गदर्शन करणे व कारवाई सातत्यपूर्ण राहील याची दक्षता घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

या विशेष मोहिमेत खालील तीन बाबींवर विशेष लक्ष केंद्रित करण्यात येणार आहे:
१) अवैध मटका व जुगार
२) अंमली पदार्थांविरोधातील कारवाई
३) धारदार शस्त्रे व अग्निशस्त्रांविरोधातील कारवाई

नागरिकांना आवाहन
मटका, जुगार, अंमली पदार्थ विक्री किंवा बेकायदेशीर शस्त्रांबाबत माहिती असल्यास नागरिकांनी तात्काळ जवळच्या पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा किंवा ११२ हेल्पलाईनवर माहिती द्यावी, असे आवाहन नांदेड जिल्हा पोलिसांनी केले आहे.

महत्वाचे संपर्क क्रमांक:

पोलीस अधीक्षक, नांदेड : ८८०२००७९३८
अप्पर पोलीस अधीक्षक, नांदेड शहर : ९१५८८३५८५८
अप्पर पोलीस अधीक्षक, भोकर : ९६६५४७९३३३

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *