उष्माघात कारणे आणि उपाय याविषयी डॉ. संतोष सूर्यवंशी यांची आकाशवाणीवर मुलाखत

नांदेड,30- राज्यात सध्या उष्णतेची तीव्र लाट सुरू असून नांदेड जिल्ह्यातही तापमानात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांनी उष्माघातापासून बचाव करण्यासाठी आवश्यक ती खबरदारी घेणे अत्यंत गरजेचे आहे.
याच अनुषंगाने नांदेड जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाचे प्रभारी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संतोष सूर्यवंशी यांची उष्माघाताची कारणे, लक्षणे व प्रतिबंधात्मक उपाय याविषयी मिलिंद व्यवहारे यांनी मुलाखत घेतली आहे. ही मुलाखत शुक्रवार, दि. 1 मे रोजी सकाळी 8.15 वाजता नांदेड आकाशवाणी केंद्रावरून प्रसारित होणार आहे.
या मुलाखतीमध्ये उष्माघाताची कारणे, त्याची प्रमुख लक्षणे तसेच तात्काळ करावयाचे उपाय याबाबत उपयुक्त माहिती देण्यात आली आहे. तरी जिल्ह्यातील सर्व श्रोत्यांनी ही मुलाखत ऐकावी, असे आवाहन नांदेड आकाशवाणी केंद्राच्या वतीने करण्यात आले आहे.



