शिक्षण
मुदखेड येथील उर्दू माध्यमातील विद्यार्थ्याचे यश

मुदखेड तालुका प्रतिनिधी मोहम्मद हकीम / मुदखेड तालुक्यातील मौलाना अबुल कलाम आझाद हायस्कूल (उर्दू माध्यम) येथे शिकणाऱ्या मोहम्मद साद मोहम्मद जमील याने नववीच्या परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन केले आहे. चांगल्या गुणांनी उत्तीर्ण होत त्याने दहावी वर्गात प्रवेश घेतला आहे.
यावेळी शाळेचे मुख्याध्यापक मोहम्मद नवीद तसेच सहशिक्षक महंमद माजिद यांच्या हस्ते त्याला गुणपत्रिका देण्यात आली. याप्रसंगी शिक्षकांनी त्याच्या पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या मोहम्मद साद हे तालुका पत्रकार मोहम्मद हकीम यांचे पुतणे आहे



