जिला
महाराष्ट्र दिनानिमित्त लोहा तहसील कार्यालयात उत्साहात कार्यक्रम
लोहा : महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने लोहा तहसील कार्यालयात ध्वजारोहणाचा कार्यक्रम उत्साहात पार पडला. ध्वजारोहणानंतर स्वातंत्र्य सैनिक तसेच आणीबाणीच्या काळात सरकारविरोधात आंदोलन करणाऱ्या स्वातंत्र्य सैनिकांचा सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमास प्रतापराव पाटील चिखलीकर, तहसीलदार विठ्ठल परळीकर, नगराध्यक्ष शरद पाटील पवार, उपनगराध्यक्ष करीम शेख, पोलिस निरीक्षक नागनाथ आयलाने यांच्यासह मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.
कार्यक्रमात स्वातंत्र्य सैनिकांच्या कार्याचा गौरव करत त्यांच्या योगदानाची आठवण करून देण्यात आली. छाया : विनोद महाबळे



