जिला
लोहा : जायवाडी वसाहतीतील पंचशील ध्वज व बौद्ध विहार नामफलक प्रकरणी कारवाईची मागणी

लोहा येथील जायवाडी वसाहतीमध्ये पंचशील ध्वज व विश्वशांती बौद्ध विहाराच्या नियोजित जागेचा नामफलक काढणाऱ्यांवर तात्काळ कारवाई करावी, या मागणीचे निवेदन तहसीलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी विठ्ठल परळीकर यांना वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी दिले.
यावेळी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष शंकर महाजन, प्रा. राज आटकोरे, जिल्हा महासचिव रवि पंडित, प्रशांत गोडबोले, माजी नगरसेवक पंचशील कांबळे, जयपाल ढवळे, संतोष भावे, छगन हटकर, मोहन सोनकांबळे, सुभाष खाडे, करण साबळे, शेषराव हंकारे, सचिन नवघडे, गोविंद सोनवळे, बाळासाहेब खिल्लारे, अविनाश कांबळे, सारनाथ जोंधळे, निवृत्ती तिगोटे, डॉ. रामचंद्र वनंजे यांच्यासह मोठ्या संख्येने वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्ते व बौद्ध बांधव उपस्थित होते. छाया : विनोद महाबळे



