क्राईम

‘परळीतील तौहीद खान हत्या प्रकरणात आरोपींवर ‘मोक्का’ लावा; पीडित कुटुंबाला २५ लाखांची मदत द्या’ मुस्लिम अधिकार परिषदेची मागणी

 

परभणी : परळी (जि. बीड) येथील तौहीद खान या मुस्लिम तरुणाच्या निर्घृण हत्येप्रकरणी सर्व आरोपींवर ‘मोक्का’ (MCOCA) अंतर्गत कारवाई करण्यात यावी तसेच पीडित कुटुंबाला तातडीने २५ लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर करावी, अशी मागणी मुस्लिम अधिकार परिषदने राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री मा. देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली असून आज (मंगळवार) संघटनेच्या शिष्टमंडळाने परभणीच्या निवासी उपजिल्हाधिकारी अनुराधा ढालकरी यांची भेट घेऊन सदर मागण्यांचे निवेदन सादर केले. यावेळी परळी येथील तौहीद खान हत्या प्रकरणाची सखोल चौकशी करून सर्व संबंधित आरोपींवर कठोर कारवाई करण्यात यावी, तसेच पीडित कुटुंबाला न्याय व आर्थिक मदत मिळावी, अशी मागणी करण्यात आली.

निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, या प्रकरणात सध्या दोन आरोपींना अटक करण्यात आली असली तरी संपूर्ण कटामध्ये आणखी काही व्यक्तींचा सहभाग असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. तसेच हत्येच्या संदर्भातील कथित ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल होत असून, त्यामध्ये गुन्ह्याचे समर्थन केल्याचे आरोप करण्यात आले आहेत. त्यामुळे या घटनेची निष्पक्ष, सखोल व उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे. सर्व आरोपी व त्यांच्या पाठीराख्यांना तातडीने अटक करणे, गुन्ह्यातील आरोपींवर मोक्का अंतर्गत कारवाई करणे, खटला जलदगती न्यायालयात चालविणे आणि पीडित कुटुंबाला २५ लाख रुपयांची आर्थिक मदत देणे या प्रमुख मागण्या करण्यात आल्या आहेत.

यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयात संघटनेचे अध्यक्ष वहीद पटेल, नगरसेवक इमरान खान, Adv. असरार अहमद, शेख सुलेमान, सय्यद इरशाद अली, शेख सईद हुसैन, आबेद मुल्ला, शेख यूनुस, शेख़ सैफ़ अहमद, साजिद बेलदार, मोहम्मद जुनैद, रहीम तांबोळी, शेख शहज़ाद, शेख़ मुज़म्मिल, शेख़ अलीम, यामीन पटेल, शेख़ निहाल इ. उपस्थित होते.

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *