जिला
महानगरपालिका शाळा क्र. ०५, लेबर कॉलनी येथे प्रवेशोत्सव उत्साहात संपन्न
आज महानगरपालिका शाळा क्र. ०५, लेबर कॉलनी येथे प्रवेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून महानगरपालिका उपायुक्त श्री अभिजीत वायकोस साहेब यांची विशेष उपस्थिती लाभली. तसेच शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा उषाताई शेळके यांची प्रमुख उपस्थिती लाभली. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक अब्दुल अलीम सर यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
कार्यक्रमास भालेराव सर,चरकुलवार सर व शिक्षकवृंद, पालक ,विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी सर्व विद्यार्थ्यांना मोफत शालेय गणवेश, पाठ्यपुस्तके व शैक्षणिक साहित्याचे वितरण करण्यात आले. तसेच विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आले.
विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे प्रवेशोत्सव आनंदी व उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.



