शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांचे उत्साहात स्वागत; वही, पुस्तके व गुलाब पुष्पांचे वितरण
लोहा/कंधार, दि. 15 जून नवीन शैक्षणिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांचे विविध उपक्रमांतून उत्साहात स्वागत करण्यात आले. लोहा तालुक्यातील सुनेगाव आणि कंधार तालुक्यातील बोरी (पू) येथील जिल्हा परिषद शाळांमध्ये विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व पुष्प देऊन आनंदी वातावरणात शाळेची सुरुवात झाली.
लोहा तालुक्यातील जि.प. केंद्रीय प्राथमिक शाळा सुनेगाव येथे जि.प. बांधकाम विभागाचे उपअभियंता शिवाजीराव राठोड यांच्या वतीने विद्यार्थ्यांना वही, पेन व शालेय पुस्तके भेट देण्यात आली. शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना आवश्यक शैक्षणिक साहित्य मिळाल्याने विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळाले.

यावेळी शाळेचे मुख्याध्यापक यु. टी. राजारुपे, सहशिक्षक डी. जी. घोडके, पंदलवाड, नागनाथ सानप, काचमांडे, आनकाडे, गोडनारे, सौ. कळसकर, सौ. राठोड, एन. एन. भंडारे तसेच शालेय व्यवस्थापन समितीचे सदस्य व पालक उपस्थित होते.
तर कंधार तालुक्यातील जि.प. प्राथमिक शाळा बोरी (पू) येथे विद्यार्थ्यांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांना शालेय पुस्तकांचेही वितरण करण्यात आले. कार्यक्रमास मुख्याध्यापिका सौ. मिरा करेवाड, सहशिक्षक आर. एन. केंद्रे, शालेय व्यवस्थापन समिती सदस्य व पालक उपस्थित होते.
नवीन शैक्षणिक वर्षाच्या प्रारंभी विद्यार्थ्यांचे स्वागत व शैक्षणिक साहित्य वितरणामुळे विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.


