जिला

अखेर टॉवरची घडी धावली; पत्रकार किशोरकुमार वागदारीकर यांच्या वर्षभराच्या लढ्याला यश

नांदेड : शहराच्या ऐतिहासिक अस्मितेचे प्रतीक असलेल्या जुना मोंढा टॉवरवरील बंद पडलेली घडी अखेर पुन्हा सुरू झाली आहे. पत्रकार तथा सामाजिक कार्यकर्ते किशोरकुमार वागदारीकर यांनी जवळपास वर्षभर केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश मिळाल्याने नांदेडकरांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.

अनेक वर्षांपासून बंद असलेल्या या घड्याळामुळे शहराच्या ऐतिहासिक वैभवाला ग्रहण लागल्याची भावना नागरिकांमध्ये होती. नांदेडच्या ओळखीचा अविभाज्य भाग असलेली ही घडी पुन्हा सुरू व्हावी, यासाठी वागदारीकर यांनी महानगरपालिका प्रशासन, विभागीय आयुक्त, नगरविकास विभाग तसेच मुख्यमंत्री कार्यालयापर्यंत सातत्याने पाठपुरावा केला. विविध स्तरांवर निवेदने, स्मरणपत्रे आणि पत्रव्यवहार करून त्यांनी हा प्रश्न कायम चर्चेत ठेवला.

अखेर प्रशासनाने या मागणीची गांभीर्याने दखल घेत टॉवरवरील घडीची दुरुस्ती पूर्ण केली आणि ती पुन्हा कार्यान्वित केली. अनेक वर्षांनंतर घड्याळाचे काटे फिरू लागल्याने जुना मोंढा परिसरातील नागरिक, व्यापारी आणि इतिहासप्रेमींनी आनंद व्यक्त केला.
शहराच्या ऐतिहासिक वारशाच्या जतन-संवर्धनाच्या दृष्टीने हा महत्त्वपूर्ण टप्पा मानला जात आहे.

टॉवरवरील घडी पुन्हा सुरू होणे ही केवळ तांत्रिक दुरुस्ती नसून नांदेडच्या इतिहासाला, संस्कृतीला आणि शहराच्या ओळखीला दिलेला सन्मान असल्याची भावना नागरिक व्यक्त करीत आहेत. त्यामुळे नांदेडची हरवलेली शान पुन्हा एकदा दिमाखात परतल्याचे चित्र दिसून येत आहे.

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *