क्राईम

ऑपरेशन क्रॅकडाऊन अंतर्गत 11.15 लाखांचा प्रतिबंधित गुटखा जप्त स्थानिक गुन्हे शाखा, नांदेडची मोठी कारवाई

हिमायतनगर : नांदेड जिल्हा पोलिसांनी ‘ऑपरेशन क्रॅकडाऊन’ अंतर्गत मोठी कारवाई करत दोन आरोपींकडून प्रतिबंधित गुटखा, पानमसाला, सुगंधीत जर्दा व तंबाखूसह स्विफ्ट डिझायर कार असा एकूण 11 लाख 15 हजार 640 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

या प्रकरणी शेरखॉन मुसाखान पठाण (वय 32) आणि शाहरूखखान मुसाखान पठाण (वय 28), दोघेही रा. संभाजीनगर, तामसा ता. हदगाव, यांना ताब्यात घेण्यात आले आहे.

पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांच्या आदेशानुसार अवैध धंद्यांवर कारवाई करण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अतुल भोसले यांनी विशेष पथक तयार केले होते. दिनांक 17 जून 2026 रोजी पोउपनि नागनाथ तुकडे व त्यांच्या पथकाने अन्न सुरक्षा अधिकारी अमृता दुधाटे यांच्या सहकार्याने हिमायतनगर परिसरात पेट्रोलिंग सुरू असताना हजरत चौक, बेस्ट कॉलनी येथे दोन इसम स्विफ्ट डिझायर कारमध्ये अवैध गुटखा विक्रीसाठी थांबले असल्याची गुप्त माहिती मिळाली.

माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून कार क्रमांक MH 48 F 0708 ची तपासणी केली असता महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेला गुटखा, सुगंधीत पानमसाला, जर्दा आणि तंबाखू आढळून आला. चौकशीत आरोपींनी आणखी माल हिमायतनगर येथील भाड्याच्या घरात लपवून ठेवल्याची कबुली दिली.

यानंतर घराची झडती घेतली असता नायलॉनच्या पोत्यांमध्ये मोठ्या प्रमाणात प्रतिबंधित गुटखा व पानमसाला सापडला. घरातील माल व कारसह एकूण 11,15,640 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

दोन्ही आरोपींना ताब्यात घेऊन मुद्देमालासह हिमायतनगर पोलीस ठाण्याच्या स्वाधीन करण्यात आले असून पुढील तपास सुरू आहे.

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *