जिला

नांदेडच्या जुन्या शहरातील वीज समस्यांवर SDPI चे महावितरणला निवेदन

 

नांदेड, प्रतिनिधी : सोशल डेमोक्रेटिक पार्टी ऑफ इंडिया (SDPI), नांदेडच्या वतीने नांदेडच्या जुन्या शहर भागातील गंभीर वीज समस्यांबाबत महावितरण प्रशासनाला निवेदन देण्यात आले. या निवेदनाद्वारे वाढत्या लोकसंख्येच्या तुलनेत अपुरी वीजपुरवठा व्यवस्था, वारंवार खंडित होणारी वीज, जुन्या व जर्जर वीजवाहिन्या आणि कर्मचाऱ्यांच्या कमतरतेकडे लक्ष वेधण्यात आले.

SDPI च्या मते, जुन्या शहरातील नागरिक, व्यापारी तसेच विद्यार्थी दीर्घकाळापासून वीज समस्येमुळे त्रस्त आहेत. ट्रान्सफॉर्मरवर वाढलेला अतिरिक्त भार, वारंवार होणारे तांत्रिक बिघाड आणि अपुरी मनुष्यबळ यामुळे नागरिकांमध्ये नाराजीचे वातावरण आहे.

पक्षाने अधीक्षक अभियंता, महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लिमिटेड (महावितरण), नांदेड यांच्याकडे विविध मागण्या मांडल्या आहेत. यामध्ये जुन्या शहरात अखंडित वीजपुरवठा सुनिश्चित करणे, नवीन डीपी बसवणे, सर्व डीपीचे मानकांनुसार अर्थिंग करणे, 25 ते 30 वर्षे जुन्या एलटी लाईन्स व कंडक्टर तातडीने बदलणे आदी मागण्यांचा समावेश आहे.

तसेच देगलूर नाका, खुदवाई नगर, रेल्वे ट्रॅक आणि बिलाल नगर फीडरवरील सिंगल लाईन डबल लाईनमध्ये रूपांतरित करणे, सर्व फीडरवर एबी स्विच बसवणे आणि वाढती लोकसंख्या लक्षात घेऊन देगलूर नाका परिसरात नवीन सब-स्टेशन उभारण्याची मागणी करण्यात आली आहे.

याशिवाय मालटेकडी वीज वितरण कार्यालयातील कर्मचाऱ्यांची संख्या सध्याच्या 7 वरून किमान 25 पर्यंत वाढवावी, जेणेकरून ग्राहकांच्या तक्रारी आणि तांत्रिक अडचणींचे जलद निराकरण करता येईल, अशी मागणी SDPI ने केली आहे.

या सर्व मागण्यांवर महावितरण प्रशासनाने तातडीने कार्यवाही करावी, अन्यथा जनआंदोलन छेडण्याचा इशारा SDPI, नांदेडच्या वतीने देण्यात आला आहे.

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *