जिला

मुंबईचे खासदार संजय पाटील यांच्या वक्तव्याचा मुदखेडमध्ये तीव्र निषेध….; तहसीलदारांना निवेदन

 

मुदखेड दि. २८ मुंबईचे खासदार संजय पाटील यांनी पत्रकार परिषदेत पत्रकारांना दिलेल्या धमकीवजा भाषेचा मुदखेड येथील मराठी पत्रकार परिषदेच्या वतीने तीव्र शब्दांत निषेध करण्यात आला आहे. या संदर्भात पत्रकारांच्या शिष्टमंडळाने मुदखेडचे तहसीलदार यांना निवेदन सादर करून कारवाईची मागणी केली आहे.

लोकशाही आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर घाला
दिनांक २५ जून रोजी मुंबई येथे आयोजित एका पत्रकार परिषदेत खासदार संजय दिना पाटील यांनी पत्रकारांना उद्देशून धमकीवजा भाषा वापरली होती. लोकशाहीचा चौथा स्तंभ असलेल्या पत्रकारितेवर आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर हा थेट घाला आहे, अशी तीव्र भावना नांदेड जिल्हा पत्रकार संघाचे सहसचिव ईश्वर पिन्नलवार,व मा. तालुकाध्यक्ष सिद्धार्थ चौदंते,यांनी निवेदन देताना व्यक्त केली आहे.

मुदखेड नायब तहसीलदार पाटे , नायब तहसीलदार मारोती जगताप, नायब तहसीलदार संतोष कामठेकर यांना दिलेल्या निवेदनात पत्रकारांनी मागणी केली की शासन दरबारी या तीव्र भावना पोहोचवून खासदार संजय दिना पाटील यांच्यावर योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात यावी. तसेच, पत्रकारांना आपले कर्तव्य निर्भयपणे बजावता यावे यासाठी त्यांना योग्य ते संरक्षण देण्यात यावे अशी मागणी निवेदन देताना मराठी पत्रकार परिषदेचे जिल्हा सहसचिव ईश्वर पिन्नलवार, मुदखेडचे मा. तालुकाध्यक्ष सिद्धार्थ चौदंते, सचिव साहेबराव गागलवाड , प्रताप देशमुख बारडकर, गंगाधर डांगे,साहेबराव हौसरे, धम्मदाता कांबळे, मनोज कमठे, हफीज कुरेशी, यांच्यासह तालुक्यातील अनेक पत्रकारांनी स्वाक्षऱ्या करून या निषेधाला पाठिंबा दिला.

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *