मुदखेड येथील मुस्लिम बांधवांच्या वतीने नाझिया इलाही यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी

मुदखेड प्रतिनिधी हकिम / पैगंबर मुहम्मद (सल्लल्लाहु अलैहि व सल्लम) यांच्याबद्दल अपमानास्पद भाषा वापरणाऱ्या नाझिया इलाही यांच्या विरोधात देशभरात निदर्शने होत आहेत. ११ जून रोजी एका मुलाखतीत त्यांनी पैगंबर मुहम्मद (सल्लल्लाहु अलैहि व सल्लम) यांच्याबद्दल वापरलेल्या अपमानास्पद भाषेमुळे देशभरातील मुस्लिम समाजाच्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्यामुळे देशभरात नाझिया इलाही यांच्या विरोधात गुन्हे दाखल केले जात आहेत.
त्या अनुषंगाने दि.२६ जुन रोजी मुदखेड शहरातही मुस्लिम समाजाने नाजिया इलाही विरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी केली व पोलीस प्रशासनाला सांगितले की,जर नाझिया इलाही यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला नाही, तर आंदोलन केले जाईल असा इशारा मुस्लिम बांधवांच्या वतीने निवेदनाद्वारे केला आहे. यावेळी पोलीस निरीक्षक धीरज चव्हाण यांनी आश्वासन दिले की, ते आपल्या वरिष्ठांशी बोलून नाझिया इलाही यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात येईल.
यावेळी मुफ्ती सुलेमान, मुफ्ती नईम, अवेस कुरेशी, मोहम्मद शोएब मुजीब पठाण, मोहम्मद हुसेन, मोहम्मद वाजिद मोहसीन माजीद, लाला अब्दुल,अजीम रिझवान पठाण, आसिफ सेठ, जमीर खालिद खुरेशी, रहीम मौलाना, महंमद बुऱ्हाण, महंमद हकीम, सह मुस्लिम समाज बांधव व युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.



