क्राईम

इतवारा पोलिसांची धडक कारवाई; ६,५०० प्रतिबंधित गोळ्या, ७७१ ग्रॅम गांजा व तलवार जप्त

 

नांदेड जिल्ह्यात अमली पदार्थांविरुद्ध सुरू असलेल्या विशेष मोहिमेअंतर्गत पोलीस स्टेशन इतवारा हद्दीत प्रभावी कारवाई करण्यात आली आहे. पोलीस स्टेशन इतवारा येथे गुन्हा रजि. क्र. 229/2026 हा NDPS Act कलम 8(C), 20(B)(ii)(B) व इतर संबंधित कलमान्वये दाखल असून, सदर गुन्ह्याच्या तपासादरम्यान मोठ्या प्रमाणात प्रतिबंधित औषधे, अमली पदार्थ व शस्त्र जप्त करण्यात आले आहे.

माननीय पोलीस निरीक्षक श्री. खनाळ व पोलीस निरीक्षक शिंदे सर यांच्या मार्गदर्शनाखाली तपास अधिकारी पोलीस उपनिरीक्षक श्री. देशमुख तसेच डी.बी. पथकाचे पोलीस उपनिरीक्षक श्री. प्रवीण आगलावे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक बैग व पोलीस अंमलदार जगताप, रिठेवाड, कोलनुरे, इसराईल शेख, हरप्रीत सुखई, कदम, एलपीसी कांबळे, शिंदे तसेच इतर अधिकारी व अंमलदार यांनी ही कारवाई यशस्वीरीत्या पार पाडली.

कारवाईदरम्यान जप्त करण्यात आलेला मुद्देमाल :

– प्रिगालॅब-300 (Pregalab-300) या प्रतिबंधित औषधाचे 65 बॉक्स (प्रत्येकी 10 गोळ्यांच्या स्ट्रिपप्रमाणे एकूण 6,500 गोळ्या)
– 771 ग्रॅम गांजा
– 1 तलवार

या प्रकरणात विनोद रामचंद्र जोंधळे याच्याविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात आली असून, गुन्ह्याचा पुढील तपास सुरू आहे. सदर प्रकरणात इतर आरोपी अथवा अमली पदार्थांच्या पुरवठा साखळीचा शोध घेण्याचे काम सुरू असून, तपासाच्या अनुषंगाने पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे.

नांदेड जिल्हा पोलीसांकडून अमली पदार्थांची विक्री, साठवणूक व वाहतूक करणाऱ्यांविरुद्ध यापुढेही कठोर व प्रभावी कारवाई सुरू राहणार असून, नागरिकांनी अशा बेकायदेशीर कृत्यांची माहिती तात्काळ पोलीस प्रशासनास देऊन सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात येत आहे.

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *