जिला

दिव्यांगांसाठी कृत्रिम अवयव मोजमाप व वितरण शिबिरास सीईओ महेश पाटील यांची भेट; लाभार्थ्यांशी साधला संवाद

 

नांदेड, दि. ७ जुलै : दिव्यांग व्यक्तींना स्वावलंबी जीवन जगण्यासाठी कृत्रिम हात-पाय व कॅलिपर्स आदी सहाय्यक साधनांचे मोजमाप व वितरण शिबिर आज लोहा येथील ग्रामीण रुग्णालयात उत्साहात पार पडले. या शिबिराला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक महेश पाटील यांनी भेट देऊन लाभार्थ्यांशी संवाद साधत त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या.

यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी महेश पाटील यांनी कृत्रिम पाय बसविण्यापूर्वी व बसविल्यानंतर काय फरक जाणवला, याबाबत लाभार्थ्यांशी संवाद साधला. त्यावर दिव्यांग लाभार्थ्यांनी कृत्रिम पायामुळे चालणे अधिक सोपे होणार असून दैनंदिन हालचालींमध्ये मोठी मदत मिळेल, असे सांगत समाधान व्यक्त केले. तसेच कृत्रिम हात बसविण्यात आलेल्या एका लाभार्थ्याने आता शेतीची कामे करण्यास मोठी मदत होणार असल्याची भावना व्यक्त केली.

दिव्यांग कल्याण विभाग, सहाय्यक आयुक्त, दिव्यांग सक्षमीकरण कार्यालय, जिल्हा परिषद, पंचायत समिती, एस.आर. ट्रस्ट (मध्य प्रदेश) व लिमको (मुंबई) यांच्या संयुक्त विद्यमाने या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप माळोदे, माध्यमिक शिक्षणाधिकारी माधव सलगर, दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी अवधूत गंजेवार, नियोजन विभागाचे शिक्षणाधिकारी दिलीपकुमार बनसोडे, गटविकास अधिकारी महेंद्र कुलकर्णी यांच्यासह संबंधित अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

शिबिरामध्ये अस्थिभंगग्रस्तांसाठी कृत्रिम पाय, मनगट व खांद्यापासून कृत्रिम हात, प्लास्टिक कॅलिपर्स तसेच दैनंदिन वापरासाठी स्पोर्ट्स शूज आदी सहाय्यक साधनांचे मोजमाप व वितरण करण्यात आले. या शिबिरासाठी एकूण ९४ लाभार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी ६५ लाभार्थींनी प्रत्यक्ष उपस्थित राहून शिबिराचा लाभ घेतला.

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *