देश विदेश

हुजूर साहिब नांदेड – लोकमान्य टिळक टर्मिनस दरम्यान दोन साप्ताहिक गाड्या धावणार

 

प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन दक्षिण मध्य रेल्वेने हजूर साहिब नांदेड – लोकमान्य टिळक टर्मिनस (मुंबई) दरम्यान दोन साप्ताहिक गाड्या चालविण्याचा निर्णय घेतला आहे.

गाडी क्र. 17667 हजूर साहिब नांदेड – लोकमान्य टिळक टर्मिनस गाडी नांदेड येथून प्रत्येक बुधवारी रात्री 21.15 वाजता सुटेल आणि पूर्णा (22.15) , बसमत (23.15 ) हिंगोली (00.25), वाशिम (01.15), अकोला (03.40) आणि मनमाड (08.12) मार्गे लोकमान्य टिळक टर्मिनस येथे गुरुवारी दुपारी 13.00 वाजता पोहोचेल. या गाडीची नियमित सेवा दिनांक 08 जुलै 2026 पासून सुरु होई.

गाडी क्र. 17668 लोकमान्य टिळक टर्मिनस – हजूर साहिब नांदेड गाडी प्रत्येक गुरुवारी सायंकाळी 16.55 वाजता लोकमान्य टिळक टर्मिनस येथून सुटेल आणि मनमाड (22.10), अकोला (03.05), वाशिम (04.15), हिंगोली (05.25), बसमत (06.25), पूर्णा (07.45) मार्गे नांदेड येथे शुक्रवारी सकाळी 09.10 वाजता पोहोचेल. या गाडीची नियमित सेवा दिनांक 09 जुलै 2026 पासून सुरु होईल.
वेळापत्रक सोबत जोडले आहे.

गाडी क्र. 17665 हजूर साहिब नांदेड – लोकमान्य टिळक टर्मिनस गाडी प्रत्येक सोमवारी रात्री 21.15 वाजता नांदेड येथून सुटून पूर्णा (22.15) , बसमत (23.15 ) हिंगोली (00.25), वाशिम (01.15), अकोला (03.50) आणि मनमाड (08.50) मार्गे मंगळवारी दुपारी 13.40 वाजता लोकमान्य टिळक टर्मिनस येथे पोहोचेल. या गाडीची नियमित सेवा दिनांक 13 जुलै 2026 पासून सुरू होणार आहे.

गाडी क्र. 17666 लोकमान्य टिळक टर्मिनस – हजूर साहिब नांदेड गाडी प्रत्येक मंगळवारी सायंकाळी 16.35 वाजता लोकमान्य टिळक टर्मिनस येथून सुटून मनमाड (22.00), अकोला (03.05), वाशिम (04.15), हिंगोली (05.25), बसमत (06.25), पूर्णा (07.45) मार्गे बुधवारी सकाळी 9.10 वाजता नांदेड येथे पोहोचेल. या गाडीची नियमित सेवा दिनांक 14 जुलै 2026 पासून सुरू होणार आहे.

या विशेष गाड्यांना पूर्णा, बसमत, हिंगोली, वाशीम, अकोला, मलकापूर, भुसावळ, चाळीसगाव, मनमाड, नाशिक रोड, इगतपुरी आणि कल्याण या स्थानकांवर दोन्ही दिशांनी थांबा देण्यात आला आहे.

प्रवाशांनी या विशेष रेल्वे सेवांचा लाभ घ्यावा. या गाड्यांसाठीचे आरक्षण पीआरएस आरक्षण केंद्रे तसेच आयआरसीटीसीच्या ऑनलाइन संकेतस्थळावर उपलब्ध असून, रेल्वेच्या प्रचलित नियमांनुसार बुकिंग करता येईल

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *