जिला

जिल्हा परिषदेतील सर्व पत्रव्यवहार आता ई-ऑफिसमधूनच; मुख्य कार्यकारी अधिकारी महेश पाटील

 

नांदेड, १४- जिल्हा परिषद नांदेडमध्ये प्रशासन अधिक गतिमान, पारदर्शक आणि पेपरलेस करण्याच्या उद्देशाने सर्व विभागांनी आता ई-ऑफिस प्रणालीद्वारेच फाईल व टपाल व्यवहार करावेत, असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक महेश पाटील यांनी केले आहे.

या अनुषंगाने जिल्हा परिषद आस्थापनेतील सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांचे शासकीय ई-मेल आयडी तयार करण्यात आले असून, यापुढे कार्यालयीन पत्रव्यवहार, टपाल तसेच फाईलची देवाण-घेवाण ई-ऑफिस प्रणालीद्वारे करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
ई-ऑफिस प्रणालीच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी यापूर्वी जिल्हा व तालुकास्तरावरील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. जिल्हा परिषदेच्या गट ‘क’ संवर्गातील एकूण ८८१ कर्मचाऱ्यांपैकी ७७२ जणांची नोंदणी प्रक्रिया पूर्ण झाली आहे. तसेच आतापर्यंत ५६ हजारांहून अधिक ई-फाईल्स तयार करण्यात आल्या असून ५२ हजार ४२१ टपालांचा ई-ऑफिसद्वारे व्यवहार करण्यात आला आहे.

ई-ऑफिस प्रणालीच्या अंमलबजावणीसाठी जिल्हा कार्यक्रम प्रमुख कुलदीप जोशी समन्वयाची जबाबदारी सांभाळत आहेत. तर सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजकुमार मुक्कावार यांनीही सर्व विभागप्रमुख व अधिकाऱ्यांना टपाल व पत्रव्यवहार ई-ऑफिसद्वारेच करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

ई-ऑफिस प्रणालीमुळे कागदाचा वापर आणि छपाईचा खर्च कमी होण्यास मदत होत असून कार्यालयीन कामकाजाला गती मिळत आहे. फाईल कोणाकडे किती दिवस प्रलंबित आहे, याचा ऑनलाइन मागोवा घेता येत असल्याने पारदर्शकता आणि उत्तरदायित्व वाढत आहे. तसेच डिजिटल स्वरूपात कागदपत्रे सुरक्षित राहणे, जुन्या फाईल्स सहज शोधता येणे, डिजिटल स्वाक्षरीद्वारे मंजुरी देणे आणि आवश्यकतेनुसार दूरस्थ पद्धतीनेही कामकाज करणे शक्य होत आहे. यामुळे निर्णय प्रक्रियेला वेग येऊन नागरिकांना अधिक जलद आणि कार्यक्षम सेवा उपलब्ध होण्यास मदत होत असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले.

मुख्य कार्यकारी अधिकारी महेश पाटील यांनी सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांना ई-ऑफिसचा नियमित वापर करून गतिमान, पारदर्शक, उत्तरदायी आणि पेपरलेस प्रशासन साकार करण्यासाठी सक्रिय सहभाग नोंदविण्याचे आवाहन केले आहे.

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *