जिला

हिमायतनगर नगरपंचायतीच्या वतीने आयोजित SIR शिबिर यशस्वी; नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

 

हिमायतनगर | प्रतिनिधी अजिम हिंदुस्तानी

हिमायतनगर नगरपंचायतीच्या वतीने दारुलूम चौक चौपाटी येथे आयोजित करण्यात आलेले SIR विशेष शिबिर यशस्वीरीत्या पार पडले. या शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून मोठ्या संख्येने नागरिकांनी उपस्थित राहून SIR प्रक्रियेचा लाभ घेतला.

हा कार्यक्रम तहसीलदार पल्लवी टेमकर यांच्या नेतृत्वाखाली पार पडला. यावेळी नगरपंचायतीचे मुख्याधिकारी, लोकनियुक्त नगराध्यक्ष शेख रफीकभाई, उपनगराध्यक्ष तसेच नगरसेवक समद खान, सरदार खान, अब्दुल कलीम, फेरोज खान यांच्यासह सर्व नगरसेवक उपास्थित होते तसेच सर्व पक्षातील पदअधिकारी सामाजिक कार्यकर्ते पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते

शिबिरादरम्यान नागरिकांना SIR प्रक्रियेबाबत मार्गदर्शन करण्यात आले तसेच आवश्यक अर्ज व कागदपत्रांची पडताळणी करून नागरिकांची कामे पूर्ण करण्यात आली. प्रशासनाच्या या उपक्रमामुळे अनेक नागरिकांची कामे एकाच ठिकाणी सुलभ पद्धतीने पार पडली.

यावेळी उपस्थित मान्यवरांनी BLO (बूथ लेव्हल ऑफिसर) यांनी SIR प्रक्रियेत केलेल्या मेहनतीचे व जबाबदारीने पार पाडलेल्या कार्याचे विशेष कौतुक केले. मतदार पडताळणी व नोंदणीचे काम प्रभावीपणे पूर्ण करण्यासाठी BLO यांनी दिलेल्या योगदानाबद्दल त्यांचे अभिनंदन करण्यात आले.

या शिबिराच्या यशस्वी आयोजनामुळे नागरिकांमध्ये समाधान व्यक्त करण्यात आले असून भविष्यातही अशा लोकाभिमुख उपक्रमांचे आयोजन करण्यात यावे, अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली.

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *