जिला

हर घर तिरंगा जनजागृती रॅली; महात्मा फुले हायस्कूलच्या एनसीसी कॅडेट्सचा सक्रिय सहभाग

 

नांदेड,१३- भारतीय स्वातंत्र्याच्या गौरवशाली इतिहासाचे स्मरण, राष्ट्रप्रेमाची भावना दृढ करणे आणि प्रत्येक घरावर तिरंगा फडकविण्याचा संदेश जनतेपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने हर घर तिरंगा अभियानांतर्गत नांदेड महानगरपालिकेच्या वतीने बुधवारी भव्य तिरंगा जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या रॅलीत बाबानगर येथील महात्मा फुले हायस्कूलच्या एनसीसी आर्मी विंग व एनसीसी एअर विंगच्या सुमारे १०० कॅडेट्सनी शिस्तबद्ध व उत्साहपूर्ण सहभाग नोंदविला.
रॅलीला नांदेड-वाघाळा महानगरपालिकेच्या महापौर कविता मुळे, आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे यांच्यासह विविध मान्यवरांची उपस्थिती लाभली.

स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून आयोजित करण्यात आलेल्या या रॅलीत कॅडेट्सनी हातात तिरंगा ध्वज घेऊन देशभक्तीपर घोषणा दिल्या. त्यामुळे संपूर्ण परिसर देशभक्तीच्या वातावरणाने भारावून गेला. रॅलीची सुरुवात डॉ. शंकरराव चव्हाण यांच्या पुतळ्यापासून झाली. त्यानंतर महात्मा फुले यांच्या पुतळ्यामार्गे रॅली महात्मा गांधी यांच्या पुतळ्याजवळ पोहोचली. येथे सर्व मान्यवर, एनसीसी कॅडेट्स व नागरिकांनी एकत्रित राष्ट्रगीत गायन करून रॅलीचा समारोप केला.
या उपक्रमासाठी महात्मा फुले हायस्कूलच्या मुख्याध्यापिका सुरेखा कदम यांनी विशेष मार्गदर्शन केले. तसेच शाळेचे पर्यवेक्षक खानजोडे व एस. व्ही. जाधव यांनीही मोलाचे सहकार्य केले.

रॅलीचे संपूर्ण नियोजन महात्मा फुले हायस्कूलचे सेकंड ऑफिसर पी. एस. केंद्रे आणि फर्स्ट ऑफिसर दत्ता बारसे यांनी केले. शाळेचे शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी, पालक आणि नागरिकांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे हर घर तिरंगा जनजागृती रॅली यशस्वीरीत्या संपन्न झाली.

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *