जिला

प्रभाग क्रमांक ३ मध्ये घंटागाडीचे उद्घाटन; नागरिकांना कचराकुंड्यांचे वाटप

 

लोहा : शहरातील प्रभाग क्रमांक ३ मधील नागरिकांच्या सोयीसाठी नगरसेविका सौ. गितांजली व्यंकटेश संगेवार यांच्या वतीने कचरा संकलनासाठी घंटागाडीचे उद्घाटन तसेच नागरिकांना कचराकुंड्यांचे वाटप करण्यात आले.

यावेळी माजी आमदार रोहिदास चव्हाण, डॉ. दीपक भारती, संगेवार काका, डॉ. कानवटे, माजी उपनगराध्यक्ष व्यंकटेश संगेवार, डॉ. सौ. अनुजा बेरळकर, माजी नगरसेवक अनिल दाढेल, शरफोद्यीन शेख, डॉ. गणेश चव्हाण, डॉ. सोमावार, नगरसेवक प्र. कैलास कहाळेकर यांच्यासह प्रभागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

प्रभागातील स्वच्छता व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी घंटागाडीच्या माध्यमातून नियमित कचरा संकलन करण्यात येणार असून, नागरिकांनी कचरा रस्त्यावर न टाकता उपलब्ध करून देण्यात आलेल्या कचराकुंड्यांचा वापर करावा, असे आवाहन यावेळी करण्यात आले. छाया : विनोद महाबळे

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *