जिल्हा परिषदेत स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा; मुख्य कार्यकारी अधिकारी महेश पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण

नांदेड,१६- भारताच्या ८० व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त नांदेड जिल्हा परिषद कार्यालयाच्या प्रांगणात प्रशासक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी महेश पाटील यांच्या हस्ते मुख्य ध्वजारोहण समारंभ देशभक्तीपूर्ण वातावरणात आणि मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप माळोदे, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक तथा उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजकुमार मुक्कावार, मुख्य लेखा व वित्त अधिकारी महेश देशमुख, महिला व बालकल्याण विभागाचे जिल्हा कार्यक्रम
अधिकारी प्रशांत थोरात, पंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी डी. बी. गीरी, अमित राठोड, उपायुक्त पशुसंवर्धन डॉ. एस.बी. खुणे, सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन डॉ. प्रवीणकुमार घुले, जल जीवन मिशनचे प्रकल्प संचालक मयूरकुमार आंदेलवाड, प्राथमिक शिक्षणाधिकारी वंदना फुटाणे, माध्यमिक शिक्षणाधिकारी माधव सलगर, कृषी विकास अधिकारी डॉ. निलकुमार ऐतवडे, जिल्हा
आरोग्य अधिकारी डॉ. संतोष नवले, जलसंधारण विभागाचे प्रभारी कार्यकारी अभियंता अशोक भोजराज, ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता राहुल रावसाहेब, व्यंकटराव चव्हाण, नरेंद्र खराडे, शिक्षणाधिकारी (नियोजन) दिलीप बनसोडे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
ध्वजारोहणानंतर मुख्य कार्यकारी अधिकारी महेश पाटील यांनी उपस्थितांना तंबाखूमुक्तीची, मृद व जलसंधारण तसेच पॉश (POSH) कायद्याबाबतची शपथ दिली.

हर घर तिरंगा अभियानाच्या अनुषंगाने जिल्हा परिषद परिसरात आकर्षक सेल्फी पॉईंट उभारण्यात आला होता. राष्ट्रध्वजाच्या पार्श्वभूमीवर उभारलेल्या या सेल्फी पॉईंटने उपस्थितांचे विशेष लक्ष वेधून घेतले. अधिकारी, कर्मचारी व विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे येथे छायाचित्रे काढत स्वातंत्र्य दिनाचा आनंद साजरा केला.
तसेच महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान (उमेद) अंतर्गत स्वयंसहायता गटांनी तयार केलेल्या विविध स्थानिक उत्पादनांचे स्टॉल उभारण्यात आले होते. या स्टॉलचे उद्घाटन मुख्य कार्यकारी अधिकारी महेश पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. या उपक्रमामुळे ग्रामीण भागातील महिला बचत गटांनी तयार केलेल्या उत्पादनांना प्रभावी व्यासपीठ उपलब्ध झाले असून त्यांच्या उद्योजकतेला प्रोत्साहन मिळाले.
या सोहळ्यात जिल्हा परिषद हायस्कूल (मुलींचे), नांदेड येथील सुमारे ४० विद्यार्थिनींनी उत्साहाने सहभाग नोंदवून कार्यक्रमाची शोभा वाढवली. संपूर्ण कार्यक्रमाचे प्रभावी व सुरेख सूत्रसंचालन पद्माकर कुलकर्णी आणि मिलिंद व्यवहारे यांनी केले.



