जिला

हजरत गैबी पीर बाबांचा संदल, उर्स व धार्मिक कार्यक्रम १० व ११ सप्टेंबर रोजी महाराष्ट्रासह तेलंगणा, कर्नाटकातून भाविकांची

महाराष्ट्रासह तेलंगणा, कर्नाटकातून भाविकांच मोठी उपस्थिती अपेक्षित; संदल मिरवणूक गुरुवारी दुपारी २ वाजता

 

 

मुदखेड तालुका प्रतिनिधी मोहम्मद हकीम

मुदखेड : मुदखेड शहरापासून सुमारे दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या हजरत गैबी पीर बाबा दर्गा येथे दरवर्षीप्रमाणे यंदाही संदल, उर्स तसेच विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. हे धार्मिक कार्यक्रम १० व ११ सप्टेंबर रोजी पार पडणार असल्याची माहिती हजरत गैबी पीर बाबा संदल, उर्स व धार्मिक कमिटीच्या वतीने देण्यात आली आहे.

 

हजरत गैबी पीर बाबांच्या संदल व उर्सनिमित्त महाराष्ट्रासह शेजारील तेलंगणा आणि कर्नाटक राज्यातून मोठ्या संख्येने भाविक भक्त दरवर्षी मुदखेड येथे दाखल होत असतात. यंदाही भाविकांची मोठी गर्दी होण्याची शक्यता असून, त्यादृष्टीने धार्मिक कमिटीच्या वतीने आवश्यक नियोजन करण्यात येत आहे.

 

गुरुवारी दुपारी २ वाजता संदल मिरवणूक

 

ठरलेल्या कार्यक्रमानुसार १० सप्टेंबर रोजी गुरुवारी दुपारी २ वाजता मुदखेड शहरातील गौसे पाक बाबा, गुजरी येथून संदल मिरवणुकीस सुरुवात होणार आहे. त्यानंतर संदल मिरवणूक जुना पोलीस ठाणा, महात्मा फुले चौक, नवी आबादी रोड या प्रमुख मार्गाने मार्गक्रमण करीत सायंकाळी ७ वाजता हजरत गैबी पीर बाबा यांच्या ठरावीक दर्गा स्थळी पोहोचणार आहे.

 

संदल दर्गा स्थळी पोहोचल्यानंतर धार्मिक कार्यक्रमांना सुरुवात होणार असून, ११ सप्टेंबर रोजी उर्स व इतर विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. या कार्यक्रमात भाविकांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन धार्मिक कार्यक्रमांचा लाभ घ्यावा, असे आवाहन कमिटीच्या वतीने करण्यात आले आहे.

 

भाविकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे

 

हजरत गैबी पीर बाबांच्या संदल, उर्स व धार्मिक कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. महाराष्ट्रासह तेलंगणा व कर्नाटकातून येणाऱ्या भाविकांच्या सोयीसाठी कमिटीच्या वतीने आवश्यक तयारी करण्यात येत आहे.

 

या धार्मिक सोहळ्यास भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून संदल, उर्स व इतर धार्मिक कार्यक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन दर्गा कमिटीचे अध्यक्ष नक्कीच भाई फुलारी, उपाध्यक्ष अजिज भाई मिरचीवाले, सचिव शेख याशा ऊर्फ अहेमद भाई नासर, कोषाध्यक्ष गौस भाई मुल्ला, तसेच इसाख फुलारी, हाफीज शेख समदानी, शेख जमील फुलवाले यांच्यासह हजरत गैबी पीर बाबा संदल व उर्स कमिटीच्या सर्व पदाधिकारी आणि सदस्यांनी केले आहे.

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *