क्राईम

अवैध रेती वाहतुकीवर नांदेड ग्रामीण पोलिसांची कारवाई; हायवा ट्रकसह 40.25 लाखांचा मुद्देमाल जप्त

 

नांदेड (जिल्हा प्रतिनिधी) : जिल्ह्यात अवैध गौण खनिज उत्खनन व वाहतुकीला आळा घालण्यासाठी पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन यांच्या आदेशानुसार सुरू असलेल्या विशेष मोहिमेत नांदेड ग्रामीण पोलिसांनी मोठी कारवाई केली. मुदखेडकडून वाजेगाव बायपासकडे अवैधरीत्या रेती वाहतूक करणारा हायवा ट्रक पकडून 5 ब्रास रेतीसह एकूण 40 लाख 25 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

17 सप्टेंबर 2026 रोजी रात्री नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याचे गुन्हे शोध पथक हद्दीत पेट्रोलिंग करत असताना, मुदखेडकडून कांदा मार्केट, वाजेगाव बायपासच्या दिशेने हायवा वाहनातून बेकायदेशीररीत्या रेती वाहतूक होत असल्याची गोपनीय माहिती मिळाली.

या माहितीच्या आधारे पोलिसांनी पंचांना सोबत घेऊन कांदा मार्केट रोड, वाजेगाव बायपास येथे सापळा रचला. यावेळी संशयित हायवा ट्रक थांबवून तपासणी केली असता त्यामध्ये रेती आढळून आली. चालकाकडे रेती वाहतुकीचा अधिकृत परवाना किंवा रॉयल्टी पावतीची मागणी केली असता त्याच्याकडे कोणताही वैध परवाना नसल्याचे स्पष्ट झाले.

त्यानंतर पोलिसांनी चालक आंबादास गणेश बैने (वय 23, रा. शक्तीनगर, इतवारा, नांदेड) याच्या ताब्यातून हायवा ट्रक क्रमांक MH 26 BE 1718 किंमत 40 लाख रुपये आणि 5 ब्रास रेती किंमत 25 हजार रुपये, असा एकूण 40 लाख 25 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

याप्रकरणी नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा रजि. क्र. 1213/2026, कलम 303 (2) भारतीय न्याय संहिता तसेच कलम 48 (7), 48 (8) महाराष्ट्र जमीन महसूल संहिता अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन यांच्या आदेशानुसार, अपर पोलीस अधीक्षक सूरज गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली, पोलीस निरीक्षक ओमकांत चिंचोलकर यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक व्यंकट कुसमे तसेच पोलीस अंमलदार भिसे, कल्याणकर, टिपरसे, तेलंग आणि गफार शेख यांनी केली.

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *