क्राईम

धर्माबादेत दोन ठिकाणी अवैध जुगार अड्ड्यांवर पोलिसांची धाड; पाच जण ताब्यात

81 हजार 770 रुपयांचा मुद्देमाल जप्त; ऑनलाइन लॉटरी व मटका जुगाराविरुद्ध कारवाई

 

धर्माबाद (जि. नांदेड) : नांदेड जिल्ह्यातील अवैध धंद्यांविरुद्ध पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन यांच्या आदेशानुसार सुरू असलेल्या विशेष मोहिमेंतर्गत धर्माबाद पोलिसांनी तसेच स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने दोन वेगवेगळ्या ठिकाणी कारवाई केली. चुंगी नाका येथील दुकानात सुरू असलेल्या ऑनलाइन जुगार अड्ड्यावर तसेच रामनगर परिसरातील मोकळ्या जागेत सुरू असलेल्या मटका जुगारावर धाड टाकून पोलिसांनी पाच आरोपींना ताब्यात घेतले असून, एकूण 81 हजार 770 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

 

चुंगी नाका येथे ऑनलाइन जुगारावर कारवाई

16 सप्टेंबर 2026 रोजी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला चुंगी नाका, धर्माबाद येथील एका दुकानात काही जण संगणकावर ‘ऑनलाईन राजश्री लॉटरी’ नावाचा जुगार खेळत असल्याची गोपनीय माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी पंचांसह सदर ठिकाणी छापा टाकला.

यावेळी मोहमद असिफ पि. मोहमद अन्वर (वय 38, रा. सरस्वतीनगर, धर्माबाद), संतोष नागोजी पबतवार (वय 42, रा. बाळापूर, ता. धर्माबाद) आणि साईनाथ ऊर्फ अंजु बालेमवार (रा. देवीगल्ली, धर्माबाद) हे आढळून आले.

 

पोलिसांनी घटनास्थळावरून संगणक साहित्य, प्रिंटर, रोख रक्कम व जुगाराचे साहित्य असा 70 हजार 370 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी धर्माबाद पोलीस ठाण्यात गुन्हा रजि. क्र. 225/2026, कलम 12 (अ) महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियम अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रामनगर परिसरात मटका जुगारावर धाड

त्याच दिवशी धर्माबाद पोलिसांना रामनगर परिसरातील मोकळ्या जागेत काही जण ‘श्रीदेवी, मेन बाजार, कल्याण, कल्याण नाईट मटका’ नावाचा जुगार खेळत असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी तत्काळ कारवाई करत घटनास्थळी छापा टाकला.

या कारवाईत अजय ऊर्फ राजू गंगाधर गाजेवार (रा. सहारा कॉलनी, धर्माबाद) आणि शेख सजू (रा. बिलोली) यांना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याकडून एक मोबाईल फोन, रोख रक्कम व जुगाराचे साहित्य असा 11 हजार 400 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

याप्रकरणी धर्माबाद पोलीस ठाण्यात गुन्हा रजि. क्र. 226/2026, कलम 12 (अ) महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियम अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अवैध जुगार, मटका तसेच इतर बेकायदेशीर प्रकारांविरुद्ध पोलिसांकडून सातत्याने कारवाई करण्यात येत असून, नागरिकांनी अशा प्रकारच्या अवैध हालचालींची माहिती पोलिसांना देऊन सहकार्य करावे, असे आवाहन नांदेड जिल्हा पोलिसांनी केले आहे.

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *