क्राईम

नांदेड जिल्ह्यात अवैध व्यवसायांविरुद्ध पोलिसांची ‘मास रेड’ मोहीम; ४७ गुन्हे दाखल, ६७ आरोपींवर कारवाई

 

नांदेड (जिल्हा प्रतिनिधी) : नांदेड जिल्ह्यातील अवैध व्यवसायांचे समूळ उच्चाटन करण्याच्या उद्देशाने पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन यांच्या आदेशानुसार १८ सप्टेंबर २०२६ रोजी जिल्हाभरात विशेष ‘मास रेड’ मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेत जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यांनी समन्वयाने शहरी तसेच ग्रामीण भागातील संशयित ठिकाणी धाडसत्र राबवून दारूबंदी, मटका-जुगार, अवैध रेती वाहतूक तसेच इतर बेकायदेशीर व्यवसायांविरोधात कारवाई केली.

या विशेष मोहिमेत एकूण ४७ गुन्हे दाखल करण्यात आले असून ६७ आरोपींवर कायदेशीर कारवाई करण्यात आली. पोलिसांनी विविध कारवायांमध्ये एकूण ५ लाख ६१ हजार ३४५ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

मोहिमेअंतर्गत मटका-जुगाराच्या ४ प्रकरणांत १९ आरोपींवर कारवाई करून ६६ हजार ८८० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. दारूबंदीच्या एका प्रकरणात एका आरोपीवर कारवाई करून ८९ हजार ४६५ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. तर अवैध रेतीसंदर्भात ४२ गुन्हे दाखल करून ४७ आरोपींवर कारवाई करण्यात आली असून ४ लाख ५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

ही कारवाई दुय्यम अधिकारी व पोलीस अंमलदारांनी संयुक्तपणे केली.

जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी अशा विशेष मोहिमा यापुढेही सातत्याने राबविण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. तसेच अवैध व्यवसायांबाबतची माहिती नागरिकांनी निर्भयपणे स्थानिक पोलीस ठाणे किंवा डायल ११२ वर देऊन पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *