जिला

शिवसेना अल्पसंख्याक विभागाच्या भोकर विधानसभा उपप्रमुखपदी मोहम्मद हकीम गौस

 

मुदखेड तालुका प्रतिनिधी: मुदखेड : शिवसेना अल्पसंख्याक विभागाच्या भोकर विधानसभा उपप्रमुखपदी मोहम्मद हकीम मोहम्मद गौस यांची नियुक्ती करण्यात आली आहे. शिवसेना अल्पसंख्याक विभागाचे नांदेड जिल्हाप्रमुख अन्वर अहमद यांच्या स्वाक्षरीने तसेच वरिष्ठ नेत्यांच्या मार्गदर्शनानुसार हे नियुक्तीपत्र देण्यात आले.

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने तसेच पक्षप्रमुख व महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे, उपनेते डॉ. श्रीकांत शिंदे, उपनेते हेमंत पाटील आणि शिवसेना अल्पसंख्याक विभागाचे प्रदेशाध्यक्ष सईद भैय्या खान यांच्या सूचनेनुसार ही नियुक्ती करण्यात आल्याचे नियुक्तीपत्रात नमूद करण्यात आले आहे.

नांदेड जिल्ह्याचे मार्गदर्शक आमदार बालाजीराव कल्याणकर, आमदार आनंद पाटील बोकारकर तसेच आमदार बालाजी कदम कोहळीकर यांच्या नेतृत्वाखाली पक्षाचे काम अधिक प्रभावीपणे करण्याची अपेक्षा नियुक्तीपत्रातून व्यक्त करण्यात आली आहे.

नवनियुक्त उपप्रमुख मोहम्मद हकीम मोहम्मद गौस यांनी सर्वांना सोबत घेऊन शिवसेना पक्षाच्या वाढीसाठी सक्रियपणे कार्य करावे, अशी अपेक्षाही व्यक्त करण्यात आली आहे.

दरम्यान, मोहम्मद हकीम मोहम्मद गौस यांची नियुक्ती झाल्याबद्दल शिवसेना पदाधिकारी, कार्यकर्ते व समर्थकांकडून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *