गौसे पाक यांचा संदल आज; गुजरी येथे मिरवणुकीसह कव्वालीचा कार्यक्रम

मुदखेड : तालुका प्रतिनिधी मोहम्मद हकीम / मुदखेड शहरातील गुजरी परिसरात दर्गा गौसे पाक यांच्या संदलचा कार्यक्रम आज, बुधवार दि. २३ सप्टेंबर रोजी दुपारी ४ वाजता आयोजित करण्यात आला आहे. दर्ग्याच्या ठिकाणाहून संदल काढण्यात येणार असून, त्यानंतर त्याच परिसरात मिरवणूक काढण्यात येणार आहे.
यावेळी आज रात्री ठीक ०९.०० वाजता गुजरी परिसरातील नगरपालिकेच्या फंक्शन हॉलमध्ये कव्वालीच्या कार्यक्रमाचेही आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात प्रसिद्ध कव्वाल अली जावेद वारसी हे कव्वाली सादर करणार आहेत.
या धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमाला शहरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.
संदल व इतर कार्यक्रमाचे अध्यक्ष शेख फरीद शेख बाबू, उपाध्यक्ष मोहम्मद बुरहान अब्दुल मजित यांच्यासह मोहम्मद हकीम मोहम्मद गौस, शेख इद्रिस शेख बाबू, शेख इरफान शेख मेहबूब, शेख जमील शेख मदार, झियाउद्दीन सलाउद्दीन, मोहम्मद इमरान शेख हैदर, इक्बाल कुरेशी तसेच समितीच्या सदस्यांनी नागरिकांना मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे



