जिला

लोहा कृषी उत्पन्न बाजार समितीची वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात

लोहा : कृषी उत्पन्न बाजार समिती, लोहा यांच्या वार्षिक सर्वसाधारण सभेचे आयोजन करण्यात आले. यावेळी सामाजिक कार्यकर्त्या सौ. आशाताई शिंदे यांनी उपस्थित शेतकरी व व्यापाऱ्यांना मार्गदर्शन केले.

सभेदरम्यान बाजार समितीच्या कामकाजासह शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर चर्चा करण्यात आली. शेतकऱ्यांना बाजारपेठेत योग्य सुविधा मिळाव्यात तसेच त्यांच्या हिताच्या दृष्टीने बाजार समितीने प्रभावीपणे काम करावे, याबाबत यावेळी विचार मांडण्यात आले.

यावेळी मा. आमदार श्यामसुंदर शिंदे, बाजार समितीचे संचालक स्वप्नील उमरेकर, भास्कर ढगे, चंद्रसेन पाटील, बसवेश्वर धोंडे, केरबा केंद्रे, दत्ता दिघे, भाऊराव कंधारे, सौसंख्येने उपस्थित होते.

सभेत विविध विषयांवर चर्चा करून शेतकरी व बाजार समितीच्या हिताच्या दृष्टीने आवश्यक बाबींवर विचारविनिमय करण्यात आला. छाया : विनोद महाबळे

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *