जिला

१ ऑक्टोबरला FESCOM नांदेडची ‘लक्षवेधी रिकामे ताट-वाटी-तांब्या पदयात्रा’ –   संपूर्ण करमुक्ती, मूलभूत सुविधा व मृत्यूनंतर २५ हजार सहाय्याची मागणी..

एक ऑक्टोबर, जागतिक ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त कोणीही ज्येष्ठ नागरिकांनी शासनाने आयोजित केलेल्या सत्कार सोहळ्यास उपस्थित राहू नये, की सत्कार सोहळा स्वीकारू नये.. .. डॉक्टर हंसराज वैद्य.

नांदेड (प्रतिनिधी):- १ ऑक्टोबर जागतिक ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त उत्तर मराठवाडा प्रादेशिक विभाग फेस्कॉम (FESCOM) नांदेडच्या वतीने प्रतीकात्मक ‘लक्षवेधी रिकामे ताट-वाटी-तांब्या पदयात्रा’ व जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ‘प्रतीकात्मक अन्नपाणी त्याग धरणे आंदोलनाचे (-अनुच्छेद १९(१)(b) नुसार) शांततामय मार्गाने – आयोजन करण्यात आले आहे.

नांदेड जिल्ह्यातील १३६० संघांच्या ज्येष्ठ नागरिक संघ सदस्या सह, महाराष्ट्रा राज्यातील फेस्कॉमच्या अनेक संघातील ज्येष्ठ नागरिक सदस्य या लक्षवेधी ‘रिकामे ताट, वाटी, तांब्या’ सह पदयात्रेत हजारोंच्या संख्येने सहभागी  होत आहेत- आम्ही उत्तर मराठवाडा प्रादेशिक विभाग फेस्कॉम नांदेड चे पदाधिकारी तथा नांदेडचे सुज्ञ, सुहृदयी, सुसंस्कारित कोणीही ज्येष्ठ नागरिक ‘एक ऑक्टोबर ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त’ शासनाच्या वतीने केला जाणारा कुठलाही सत्कार सोहळा तथा मिष्टान्न तथा अल्पोपहार स्वीकारणार नाही असा आम्ही ठाम निर्धार केलेला आहे. तसेच संपूर्ण महाराष्ट्रातील फेस्कॉम चे सर्व पदाधिकारी तथा फेस्कॉम संघटनेतील कुण्याही  ज्येष्ठ नागरिकांनी एक ऑक्टोबरला शासनाच्या वतीने केल्या जाणाऱ्या सत्कार सोहळ्याला उपस्थित राहू नये व सत्कार स्वीकारू नये ,अल्पोपहार सुद्धा स्वीकारू नये असे आम्ही आवाहान केलेले आहे.
“प्रथम गरीब, गरजवंत, भुकेल्या, पात्र ज्येष्ठ नागरिकांच्या रिकाम्या ताटात मानधन टाका, भीक म्हणून नव्हे तर हक्क म्हणून द्या.” ही सर्वात महत्त्वाची मागणी आहे.

ज्येष्ठ नागरिकांच्या ३ प्रमुख प्रलंबित ठळक मागण्या:-

१) ‘संपूर्ण कर मुक्ती’ (४१, २६५):- पेन्शन वर  व्याज, व शेजारील राज्य व देशातील इतर अनेक राज्याप्रमाणे पण किमान पात्र गरीब गरजवंतांना प्रतिमहा ५००० रु. मानधन द्या. ते ही भारताचेच नागरिक आहोत. सन्मान धना वर कर नको. त्यांनी आयुष्यभर कर भरला, आता तरी त्यांना सन्मानाने ‘संपूर्ण करमुक्त’ करा.

२) उर्वरित आयुष्य सुखा-समाधानाने, आनंदाने व सन्मानाने जगण्यासाठी त्यांना मूलभूत सुविधा अनुच्छेद (२१, ३८(१), ४७) प्रमाणे द्या. सर्वोच्च न्यायालय निकाल २०१८/१९ नुसार सन्मानाने जगणे हा हक्क आहे. त्यांना आभासी आश्वासनांचा पाऊस नको,कुठलेही आमिष नको, उच्च श्रेणी वृद्धाश्रम नको, त्यांना गोकुळात च- कुटुंबातच – नातवा-पंतवा सह सुखा-समाधानाने, सन्मानाने व आनंदाने जगण्यासाठी – मानधन, किमान जिल्ह्याच्या ठिकाणी सर्व सोयीने युक्त असे ज्येष्ठ नागरिक भवन, तालुक्याच्या ठिकाणी व शहरातील प्रत्येक प्रभागात विरंगुळा केंद्र, संपूर्ण मोफत आरोग्य कवच, एसटी/रेल्वे तथा तत्सम सामायिक प्रवास सुरक्षित आरक्षित तथा मोफत करा, हेल्पलाईन, ज्येष्ठांच्या तक्रारींचा त्वरित निपटारा, कायदेशीर मदत आदी द्या.

३) मृत्यूपश्चात २५ हजार रुपये अंत्यसंस्कार सहाय्य:-  अनुच्छेद २१ अन्वये सन्मानाने निरोप द्या. जन्माला आल्यावर सन्मानाने जगणे हा जसा हक्क आहे, तसाच सन्मानाने निरोप देणे हाही हक्क आहे. अनेक ज्येष्ठ नागरिक निराधार आहेत. त्यांच्या कुटुंबाकडे अंत्य विधी संस्कारासाठी सुद्धा पैसे नसतात. ते कुटुंबात ‘ओझे’ तथा ‘नकोसे’ झालेले आहेत. म्हणून त्यांना मृत्यूपूर्व मानधन व मृत्यू पश्चातही आर्थिक मदतीची नितांत गरज आहे,द्या. शासनाने प्रत्येक गरीब गरजवंत तथा पात्र ज्येष्ठ नागरिकाच्या मृत्यूनंतर त्याच्या कुटुंबास – वारसास – २५ हजार रुपये अंत्यविधी सहाय्य – तात्काळ द्यावे, जसे इतर योजनांमध्ये दिले जाते. ही भीक नाही,  घटनेप्रमाणे शेवटचा सन्मान म्हणून द्या.
‘ज्येष्ठत्व गुन्हा हा नाही, नैसर्गिक संवैधानिक भूषण आहे’. ज्येष्ठ नागरिकांना सांभाळणे हे कुटुंब, समाज, स्थानिक लोकप्रतिनिधी, प्रशासन आणि शासनाची  घटनेप्रमाणे सामूहिक जिम्मेदारी आहे.

इतर मागण्या:- ज्येष्ठ नागरिकांचे केंद्रीय कायदा 2007 च्या कलम २(h) प्रमाणे वय वर्ष ६० च ग्राह्य धरा, ज्येष्ठ नागरिक हे कुटुंब, समाज, राज्य तथा राष्ट्राचा ‘आधार’ आहेत. राष्ट्राप्रती त्यांचे सहयोग, त्याग,योगदान, बलिदान, तथा समर्पण लक्षात घेऊन त्यांना ‘राष्ट्रीय संपत्ती’ म्हणून घोषित करा, ‘मुख्यमंत्री लाडके मायबाप योजना’ त्वरित कार्यान्वित करून ५००० रु. प्रतिमहा मानधन फक्त आधार पत्रा वरच द्या, शासनाच्या ज्येष्ठ नागरिकांच्या सर्व योजना साठी फक्त ‘आधार पत्रच’ ग्राह्य धरा, संपूर्ण आरोग्य कवच, एसटी बस/ रेल्वे आदी सामायिक प्रवास सुरक्षित, आरक्षित व मोफत करा,  फेस्कॉम मधील कार्यानुभव संपन्न एक महिला व एक पुरुषाच्या विधान परिषद व राज्यसभेवर  प्रतिनिधित्वाची अनुच्छेद (८०, १७१) प्रमाणे कायदेशीर तरतूद करा, ज्येष्ठ नागरिक कल्याणकारी सन्मान स्वतंत्र मंत्रालय व वेगळे आयोग (४६), ज्येष्ठ नागरिक महामंडळावर FESCOM अध्यक्षा सह १४ ही प्रादेशिक विभागातील अध्यक्षांची नेमणूक व 2007चा पारित कायदा, 2010 चे नियम, 2011 तथा 2013 व 2019 च्या सुधारित पारित कायद्यांची तंतोतंत अंमलबजावणी करा.

कुटुंब, समाज, प्रशासन, शासन,जनतेला आवाहन:- ज्येष्ठ नागरिक हा कुटुंब, समाज तथा राष्ट्राचा ‘आधारवड’ आहे. खऱ्या अर्थाने तो ‘राष्ट्रीय संपत्ती’ आणि अनुभव संपन्न ‘ठेवा’आहे. त्यांना सांभाळणे  त्यांचे उदरभरण करणे, त्यांचे संरक्षण करणे ही कुटुंबीयांची, समाजाची, स्थानिक लोकप्रतिनिधींची प्रशासनाची आणि शासनाचीही सामूहिक जबाबदारी तथा आद्य कर्तव्यच आहे.  या वयात ही त्यांना रस्त्यावर उतरण्याची वेळ आणू नये, याची नैतिक जबाबदारी शासनाची आहे. जागतिक ज्येष्ठ नागरिक दिन १ ऑक्टोबर पूर्वी मंत्रिमंडळामध्ये क्रांतिकारी निर्णय घेऊन GR काढावा व त्या दिवसाची गरीब गरजवंतांना सप्रेम भेट तथा सार्वजनिक सन्मान सोहळा म्हणून  साजरा करावा. – डॉ. हंसराज वैद्य, अध्यक्ष, FESCOM, उत्तर मराठवाडा, नांदेड – ९४२३१३८३८५

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *