जिला
पोलीस उप महानिरीक्षक श्री शहाजी उमाप यांचा नांदेड जिल्ह्यातील नागरिकांशी संवाद

दिनांक 30.09.2026 रोजी पोलीस उप महानिरीक्षक श्री शहाजी उमाप हे नांदेड जिल्हा पोलीसांच्या कामकाजाचा मासिक आढावा घेण्यासाठी पोलीस अधीक्षक कार्यालय, नांदेड येथे उपस्थित असणार आहेत.
या दरम्यान, नागरिकांच्या तक्रारी ऐकून घेण्यासाठी दुपारी 02.00 ते 03.30 हा वेळ राखीव ठेवण्यात आला आहे.
नागरिकांना विनंती करण्यात येते की, या दरम्यान आपल्या समस्या मांडण्यासाठी त्यांनी पोलीस अधीक्षक कार्यालय, नांदेड येथे उपस्थित राहावे.
पोलीस उप महानिरीक्षक कार्यालय, नांदेड परिक्षेत्र, नांदेड



