जिला

एक दिवस, एक घंटा, एक साथ; १ ऑक्टोबरला जिल्हाभर स्वच्छता मोहीम

स्वच्छता मोहिमेत नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे : सीईओ महेश पाटील

 

 

नांदेड,२९- स्वच्छता ही सेवा पंधरवड्याच्या अनुषंगाने १ ऑक्टोबर २०२६ रोजी जिल्ह्यात एक दिवस, एक घंटा, एक साथ या संकल्पनेवर आधारित विशेष स्वच्छता व श्रमदान मोहीम राबविण्यात येणार आहे. या उपक्रमात नागरिकांनी उत्स्फूर्तपणे सहभागी होऊन स्वच्छतेच्या लोकचळवळीला बळ द्यावे, असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी महेश पाटील यांनी केले आहे.

या मोहिमेचा मुख्य उद्देश स्वच्छतेच्या कार्यात नागरिकांचा व्यापक सहभाग वाढविणे हा आहे. जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींमध्ये ग्रामस्थ, युवक, महिला, महिला बचत गट, स्वयंसेवी संस्था तसेच विविध सामाजिक घटकांना सहभागी करून सार्वजनिक ठिकाणी विशेष स्वच्छता व श्रमदान करण्यात येणार आहे.

या अंतर्गत गावातील मुख्य रस्ते, चौक, शासकीय कार्यालयांचे परिसर, शाळा, प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्र परिसर तसेच जलस्रोतांच्या आसपासच्या ठिकाणी स्वच्छता करण्यात येणार आहे. सामूहिक सहभागातून गावातील सार्वजनिक ठिकाणे स्वच्छ करण्यासोबतच नागरिकांमध्ये स्वच्छतेबाबत जनजागृती करण्यात येणार आहे.

नागरिकांनीही या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद देत मोठ्या संख्येने श्रमदानात सहभागी व्हावे, असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी महेश पाटील, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी परिक्षीत यादव, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक डॉ. संजय तुबाकाले, ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी डी. बी. गिरी, जिल्हा पाणी व स्वच्छता मिशनचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी मयूरकुमार आंदेलवाड, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. नवले आणि शिक्षणाधिकारी माधव सलगर यांनी केले आहे.

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *