जिला

मतदारयादी विशेष सखोल पुनरिक्षण प्रकिया पारदर्शकपणे राबवावी. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी- शरदचंद्र पवार पक्षाची मागणी.

 

नांदेड – भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार राबविण्यात येत असलेली मतदारयादी विशेष सखोल पुनरिक्षण प्रक्रिया (एस.आय.आर.) पारदर्शकपणे राबविण्यात यावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी-शरदचंद्र पवार पक्षाच्यावतिने जिल्हाधिकारी यांना आज करण्यात आली.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी- शरदचंद्र पवार पक्षाचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष भगवानराव पाटील आलेगांवकर व शहर जिल्हाध्यक्ष डॉ.सुनील कदम यांच्या मार्गदर्शनातून आज पक्षाच्या शिष्टमंडळाने निवासी उपजिल्हाधिकारी यांची भेट घेऊन निवेदनाद्वारे याबाबत मागणी केली.

मतदारयादी अद्यावत व त्रुटी विरहित राहणे,पात्र नागरिकांचे नांव मतदार यादीत राहणे हा लोकशाही प्रक्रियेचा अत्यंत महत्वाचा भाग असून एस.आय.आर.प्रक्रियेदरम्यान अनावधानाने वंचित राहू नये तसेच,आवश्यक कागदपत्रे व प्रक्रिया पूर्ण करतांना कोणत्या अडचणी येऊ नयेत यासाठी जिल्ह्यातील सर्वच बिएलओ व संबंधित अधिकारी-कर्मचारी यांना स्पष्ट व एकसमान सूचना द्याव्या,नागरिकांना आवश्यक कागदपत्रे,अर्ज प्रक्रिया व अंतिम मुदतीबाबत जनजागृती करण्यात यावी, प्रत्येक मतदानकेंद्राच्या कार्यक्षेत्रात नागरिकांच्या तक्रारी व अडचणी नोंदविण्यासाठी प्रभावी व्यवस्था करावी,वृद्ध,दिव्यांग,आजारी व विशेष गरज असलेल्या नागरिकांसाठी सुलभ सूविधा उपलब्ध करून द्यावी,स्थलांतरित,

भाडेकरू व अन्य पात्र नागरिकांना मतदारयादीशी संबंधित प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी विशेष मार्गदर्शन देऊन मतदारयादीतील नांव,पत्ता व इतर तपशिलातील त्रुटी दूर करण्यासाठी नागरिकांना सुलभ व पारदर्शक प्रक्रिया उपलब्ध करून द्यावी,नागरिकांना आवश्यक असल्यास बिएलओ,एआरओ,एईआरओ यांच्याशी संपर्क साधण्यासाठी त्यांचे संपर्क क्रमांक प्रसिद्धी माध्यमांतून सार्वजनिक करण्यात यावे, ग्रामीण व दुर्गम भागात विशेष शिबीरे आयोजित करुन नागरिकांच्या अडचणीचे जागेवरच निराकरण करण्यात यावे,

कोणत्याही पात्र नागरिकांचे नांव केवळ माहितीअभावी,तांत्रिक अडचणीमूळे किंवा प्रक्रियात्मक गेरसमजामूळे वगळले जाऊ नये यासाठी विशेष दक्षता घ्यावी,एस.आय. आर.प्रक्रियेदरम्यान प्राप्त होणाऱ्या नागरिकांच्या व राजकीय पक्षांच्या तक्रारींचे वेळेत निराकरण करण्यासाठी जिल्हास्तरावर स्वतंत्र समन्वय यंत्रणा उपलब्ध करून द्यावी,प्रत्येक टप्प्यावर राजकीय पक्षाच्या अधिकृत प्रतिनिधींना आवश्यक माहिती व मार्गदर्शन उपलब्ध करुन देऊन प्रक्रिया पारदर्शक राबविण्यात यावी या बाबींची दखल घेऊन जिल्ह्यात एस.आय.आर.प्रक्रिया पारदर्शक,सर्वसमावेशक व सुलभ पद्धतीने राबविण्यात यावी. लोकशाही प्रक्रियेत प्रत्येक पात्र नागरिकांचा मतदानाचा अधिकार अबाधित राहणे अत्यंत महत्वाचे असल्याने दिलेल्या सूचना,अडचणींची गांभीर्याने दखल घ्यावी अशीही विनंती यावेळी निवेदनातून करण्यात आली.

यावेळी पक्षाचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष भगवानराव पाटील आलेगांवकर,शहर जिल्हा उपाध्यक्ष तातेराव पाटील आलेगांवकर,प्रदेश कार्यकारिणी सदस्या सौ.कल्पनाताई डोंगळीकर, अल्पसंख्याक सेलचे प्रदेश कार्याध्यक्ष डॉ.मुजाहिदखान, राष्ट्रवादी किसान सभेचे माजी प्रदेश प्रतिनिधी लक्ष्मण भवरे, बालासाब मादसवाड,माजी नगरसेवक प्रकाश मुराळकर,प्रकाश गायकवाड,किसान सेलचे जिल्हाध्यक्ष श्याम कपाळे,सामाजिक न्याय विभागाचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष दिगांबर गवळे, ओबीसी सेलचे शहर जिल्हाध्यक्ष गंगाधर महाजन,शिखसेलचे तरविंदरसिंघ बडगुजरा आदींची उपस्थिती होती.

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *