बेलदार समाजाची नांदेड तालुका कार्यकारिणी जाहीर

नांदेड/प्रतिनिधी… बेलदार समाज विकास संस्थेच्या नांदेड तालुकाध्यक्षपदी शरद मारतराव बुरपल्ले, उपाध्यक्षपदी सौ. मीनाक्षी विनायक सगर तर सचिव पदी लक्ष्मण किशनराव वडमिले यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.
निळा रोड येथील प्रसिद्ध उद्योजक अनिल शेटकार यांच्या अनिल लॉन्स येथे बेलदार समाज विकास संस्थेचे अध्यक्ष राम आचेमवाड यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून समाजरत्न कोंडीबा बुरपल्ले, संस्थेचे सचिव आत्माराम वग्गावाड यांची प्रमुख उपस्थिती होती.

तालुका कार्यकारिणीत सहसचिव अँड. गोविंद गुजरवाड, कोषाध्यक्ष सौ.आरती गोणे, सदस्य गणेश राऊतवार, रवींद्र सगर, लक्ष्मण आचेमवाड, साईनाथ मंदावाड, अंतेश्वर मंडले, बालाजी मंदावाड, यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.बेलदार समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी जिल्ह्यात समाज बांधव संघटित होणे काळाची गरज असल्याचे यावेळी प्रमुख पाहुणे कोंडीबा बुरपल्ले यांनी आपले मत व्यक्त करून नवनिर्वाचित समाज संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना शुभेच्छा दिल्या तर संस्थेचे सचिव आत्माराम वग्गावाड यांनी प्रस्ताविकातून संस्थेच्या कार्याचा आढावा सादर करून तालुका कार्यकारणीची निवड प्रक्रिया पार पाडली.
नवनिर्वाचित उपाध्यक्ष सौ. मीनाक्षी सगर, लक्ष्मण वडमिले, अँड. गोविंद गुजरवाड, नारायण गोणे यांनी आपले मत व्यक्त करून समाजकार्य पुढे नेण्याचे आश्वासित केले. कार्यक्रमाचे संचालन प्रा. संतोष आमनवाड तर उपस्थितीतांचे आभार प्रल्हाद आयनेले यांनी मानले. कार्यक्रमास नांदेड शहरासह तालुक्यातील समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमासाठी डॉ . ज्ञानेश्वर वडमिलवार यांनी विनामूल्य जागा उपलब्ध करून दिली. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी बेलदार समाज विकास संस्थेचे सर्व पदाधिकारी परिश्रम घेतले.



