शहर

नांदेड शहरात वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी अतिक्रमण व अवैध पार्किंगविरोधात विशेष मोहीम;

एकूण 78 केसेस (एकुण ₹78,000/-) दंड वसूल नांदेड शहर वाहतुक शाखा, वजिराबाद

 

नांदेड शहरातील प्रमुख रस्त्यांवर वाढते अतिक्रमण तसेच अवैधरित्या करण्यात येणाऱ्या वाहन पार्किंगमुळे वाहतूक कोंडी होऊन सर्वसामान्य नागरिकांना मोठ्या प्रमाणात गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर मा. डॉ. नीलाभ रोहन, पोलीस अधीक्षक, नांदेड यांच्या मार्गदर्शनाखाली शहर वाहतूक शाखेमार्फत विशेष अतिक्रमण निर्मूलन व वाहतूक नियमन मोहीम राबविण्यात येत आहे.

त्या अनुषंगाने दि. 27 ऑक्टोंबर 2026 रोजी पोलीस निरीक्षक शहर वाहतुक शाखा, महानगरपालिका, नांदेड यांचे पथकासह वजिराबाद चौक ते एस.टी. ओव्हर बसस्थानक ते रेल्वे स्थानक, हिंगोली गेट ते कविता यात्री निवास, शिवमंदिर ते राज कॉर्नर या प्रमुख मार्गांवर विशेष संयुक्त कारवाई करण्यात आली. या मोहिमेत शहर वाहतूक शाखा येथील अधिकारी व अंमलदार, RCP पथक तसेच महानगरपालिका, नांदेड यांचे पथक सहभागी झाले होते.

कारवाई दरम्यान रस्त्यालगत करण्यात आलेली अतिक्रमणे हटविण्यात आली. तसेच हातगाड्या, फळविक्रेते, टपऱ्या व वाहतुकीस अडथळा निर्माण करणारे इतर अडथळे दूर करण्यात आले. याशिवाय चुकीच्या पद्धतीने वाहन पार्किंग तसेच रहदारीस अडथळा करणे-78 केसेस (78,000/- रुपये) दंड वसूल करण्यात आला.

सर्व नागरिकांनी सार्वजनिक रस्त्यांवर अतिक्रमण करू नये, वाहतुकीस अडथळा निर्माण होईल अशा ठिकाणी वाहने उभी करू नयेत तसेच सर्व पालक, विद्यार्थी व नागरिकांनी आपल्या अल्पवयीन मुलांना वाहन चालविण्यास देऊ नये, ट्रिपल सीट प्रवास करू नये तसेच सर्व वाहतूक नियमांचे काटेकोरपणे पालन करावे, यापुढेही हि विशेष मोहिम नियमित सूरु राहणार आहे, नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध यापुढेही कठोर कारवाई करण्यात येणार आहे.

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *